मावळ ऑनलाईन – मावळ तालुक्यातील इंदोरी–वराळे जिल्हा परिषद गटात निवडणुकीचे तापमान दिवसेंदिवस ( Meghatai Bhagwat) वाढत असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या इच्छुक उमेदवार मेघाताई भागवत यांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. गुरुवारी गोळेवाडी परिसरात झालेल्या भेटीगाठी दरम्यान वडीलधारी मंडळी, माता-भगिनींनी प्रेमाने शुभेच्छा देत “आम्ही सर्व तुमच्या मागे ठामपणे उभे आहोत” असा विश्वास व्यक्त केला. या प्रेमळ प्रतिसादाने परिसरातील वातावरण उत्साही झाले आहे.
Shri Potoba Maharaj Temple : वडगावमधील काकड आरती सोहळ्याची सांगता
मेघाताई भागवत यांनी गेल्या काही वर्षांत सामाजिक कार्य, महिलांच्या प्रश्नांवरील सक्रिय भूमिका आणि सर्वसामान्यांशी जोडलेले आपुलकीचे नाते यामुळे स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे या गटातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता ( Meghatai Bhagwat) अधिक बळावली आहे.
दरम्यान, आमदार सुनील शेळके यांची भूमिका काय असणार आणि उमेदवारी कोणाला मिळणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. मात्र, जनतेच्या प्रचंड पाठिंब्यामुळे मेघाताई भागवत या जिल्हा परिषद निवडणुकीच्या स्पर्धेत प्रमुख दावेदार ठरत आहेत. त्यांच्या सभोवताल तयार झालेलं सकारात्मक वातावरण आणि लोकांच्या उत्साही प्रतिसादामुळे या निवडणुकीत इंदोरी–वराळे गटात रंगतदार लढत ( Meghatai Bhagwat) होण्याची चिन्हे आहेत.



















