मावळ ऑनलाईन –इंदौरी- नुकतीच जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर (Megha Bhagwat)झाली असून मावळ तालुक्यातील सर्वाधिक चर्चेत असलेला इंदोरी-वराळे जिल्हा परिषद गट हा सर्वसाधारण महिलांसाठी राखीव ठरला आहे. यानंतर या गटात आता राजकीय चर्चांना उधाण आलं असून प्रशांतदादा भागवत यांच्या पत्नी मेघाताई प्रशांतदादा भागवत निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. “कोणत्याही परिस्थितीत आता माघार नाही!” असा ठाम निर्धार करून मेघाताई भागवत यांनी आपली तयारी सुरु केली आहे.
गेल्या काही वर्षांपासून प्रशांतदादा भागवत आणि मेघाताई भागवत यांनी मावळ तालुक्यातील महिलांसोबत सातत्याने जनसंपर्क ठेवला असून, महिलांच्या हितासाठी विविध उपक्रम आणि भव्य कार्यक्रम राबवले आहेत. ‘मनोरंजन संध्या’, ‘कुंकू मार्चन सोहळे’, महिलांच्या सक्षमीकरणासाठी घेतलेले उपक्रम आणि सामाजिक कामातून त्यांनी आपली मजबूत ओळख निर्माण केली आहे.
Maval: मावळ पंचायत समितीचे आरक्षण जाहीर
Gold-Price: सोनं-चांदी पुन्हा महागले


स्थानिक पातळीवर मेघाताई भागवत यांचा महिलांमध्ये मोठा संपर्क आणि लोकप्रियता आहे. प्रशांतदादा भागवत यांनी केलेल्या विकासकामांचा आणि सामाजिक उपक्रमांचा फायदा आता मेघाताईंना निवडणुकीत होणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. इंदोरी-वराळे जिल्हा परिषद गटातील ही निवडणूक अत्यंत चुरशीची आणि चर्चेची ठरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
“मेघाताई भागवत यांनी ही निवडणूक लढवून विजय संपादन करण्याचा निर्धार केला आहे,” अशी माहिती त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांनी दिली.
मावळ तालुक्याच्या राजकारणात यानंतर नवीन समीकरणे निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.