मावळ ऑनलाईन –पत्नीने बोलावून घेतल्यावर पत्नीला भेटण्यासाठी गेलेल्या (Maval) पतीला पत्नी आणि तिच्या एका मित्राने शिवीगाळ करत मारहाण केली. ही घटना रविवारी (१२ ऑक्टोबर) सायंकाळी नम्रता इको सिटी, वराळे, मावळ येथे घडली.
या प्रकरणात डॉ. जितेंद्र आनंद खुबानी (४२, किवळे, देहूरोड) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार खुबानी यांची पत्नी आणि प्रदीप तलरेजा (३५, पिंपरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना त्यांच्या पत्नीने नम्रता इको सिटी येथे बोलावले. त्यामुळे ते तिथे गेले. त्यावेळी पत्नीने फिर्यादींशी भांडण करून आरोपी प्रदीप तलरेजा याला बोलावून घेतले. प्रदीप तलरेजा याने फिर्यादी यांना शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच, फिर्यादींच्या पत्नीने जितेंद्र खुबानी यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.
Maval: मावळ पंचायत समितीचे आरक्षण जाहीर
Gold-Price: सोनं-चांदी पुन्हा महागले