मावळ ऑनलाईन –वीरांचे राष्ट्रप्रेम व वीरता आपल्यासाठी प्रेरणादायी ( Maval Vichar Manch) आहे.”आपला देश हा असंख्य वीरांचा आहे. ते आपले पूर्वज आहेत. त्यांच्यातील राष्ट्रप्रेम व वीरता आपल्यामध्ये आली, तरी आपले आयुष्य एका वेगळ्या तेजाने भारून जाईल व त्याचे सार्थक होईल.असे प्रतिपादन सेवानिवृत्त लष्करी अधिकारी मोहिनी गर्गे-कुलकर्णी यांनी केले.
मावळ विचार मंचातर्फे नवरात्रीनिमित्त आयोजित सरस्वती व्याख्यानमालेत ( Maval Vichar Manch) तिसरे पुष्प गुंफताना गर्गे बोलत होत्या. अध्यक्षस्थानी भाजपचे माजी तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे,प्रमुख पाहुणे संतोष दाभाडे पाटील, बंडोपंत फाटक, बाळासाहेब फाटक, मंचाचे संस्थापक भास्करराव म्हाळसकर, कार्याध्यक्ष डॉ. रवींद्र आचार्य,यावर्षीचे अध्यक्ष गुलाबराव म्हाळसकर, कार्याध्यक्ष अजित देशपांडे, उपाध्यक्ष ॲड दामोदर भंडारी, धनश्री भोंडवे, आरती राऊत, गिरीश गुजरानी, संतोष भालेराव,अतुल म्हाळसकर आदी उपस्थित होते.
Pune Crime News : नवरात्रोत्सवात देवीच्या मूर्तीवरील दहा लाखांचा सुवर्णहार चोरीला
‘ताराराणी ते झाशीची राणी, युद्ध भूमीवर रणरागिणी’ या विषयावर गर्गे यांनी सुरुवातीला लष्करी सेवेतील अनुभव कथन केले. खडतर प्रशिक्षण, शिस्त, युद्धनीती, युद्धजन्य ( Maval Vichar Manch) परिस्थितीची माहिती दिली. सैनिकाची वर्दी म्हणजे राष्ट्राने सोपविलेला विश्वास असतो. देशातील दुर्गावती राणी, वेलू नचिया, कुर्मावती राणी, तारामती राणी, चेन्नमा राणी,अवंतीबाई, झाशीची राणी अशा वीरांगनांचा इतिहास पराक्रम सांगून त्यांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. “आपण आपले आयुष्य सकारात्मकतेने जगले पाहिजे. बहुआयामी व्यक्तिमत्व झाले पाहिजे,” असे मार्गदर्शन गर्गे यांनी केले.
व्याख्याते विवेक गुरव यांना विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले. पाककला स्पर्धेतील विजेत्या अपर्णा पोफळे, प्राजक्ता पाटील व जान्हवी महाजन यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. आरती राऊत यांनी मानपत्र वाचन, वैशाली ढोरे यांनी सूत्रसंचालन केले. आशिष ढोरे यांनी ( Maval Vichar Manch) आभार मानले.