मावळ ऑनलाईन – आपल्या जीवनामध्ये मनुष्याने वैचारिक ( Maval Vichar Manch ) दारिद्रय कधी दाखवायचे नसते. विचार हा चैतन्य शक्तीचा अविष्कार असून नेहमी विचारांची पूजा करायची असते, असे प्रतिपादन सदगुरू वामनराव पै यांचे शिष्य,जीवन विद्या मिशनचे चंद्रकांत निंबाळकर यांनी सुखी जीवनाची गुरुकिल्ली या विषयावर बोलताना केले.मावळ विचार मंच आयोजित सरस्वती व्याख्यानमालेचे सातवे पुष्प गुंफताना निंबाळकर बोलत होते.
Accident : कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात कार कोसळून अपघात; एकजण ठार तर एकजण जखमी
यावळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ( Maval Vichar Manch ) पुणे जिल्हा कृषी व पशुसंवर्धन समितीचे माजी सभापती बाबुराव वायकर, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे युवा नेते प्रशांत भागवत, समुपोदेशक समीर देसाई,मावळ विचार मंचचे संस्थापक अध्यक्ष भास्करराव म्हाळसकर,कार्याध्यक्ष डॉ.रवींद्र आचार्य,यावर्षीचे अध्यक्ष गुलाबराव म्हाळसकर,कार्याध्यक्ष अजित देशपांडे,उपाध्यक्ष ॲड दामोदर भंडारी,सचिव गिरीश गुजराणी,कार्यक्रम प्रमुख धनश्री भोंडवे,आरती राऊत, खजिनदार संतोष भालेराव, प्रसिद्धीप्रमुख अतुल म्हाळसकर आदी उपस्थित होते.

निंबाळकर पुढे बोलताना म्हणाले की,सुखी जीवनाला पैसा लागत नाही. सज्जन माणसे श्रीमंत झालेली चांगली आहे कारण त्यांच्याकडून चांगल्या कामासाठी खर्च केला जातो. माणसाकडे दामही पाहिजे आणि नामही पाहिजे. मनस्थिती बदला, परिस्थिती बदलेल असेही त्यांनी ( Maval Vichar Manch ) सांगितले.
Accident : कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात कार कोसळून अपघात; एकजण ठार तर एकजण जखमी
नेहमी हसतमुख रहावे.हसणे हे मोठे औषध आहे. जीवनात अट्टाहासाने सत्कर्म करावे आणि दुष्कर्म टाळायला हवे असे सांगत प्रपंचात पुरुषाच्या मागे स्त्री ही मोठी शक्ती आहे. पती-पत्नी हे चांगले मित्र आहेत.जीवनात दृष्टिकोन महत्त्वाचा असून आपल्या मुलांना कमी लेखू नका हीच गुरुकिल्ली आहे.असे ही त्यांनी सांगितले.
सूत्रसंचालन माजी नगरसेवक प्रसाद पिंगळे यांनी केले तर सन्मान पत्राचे वाचन रवींद्र म्हाळसकर व आभार शेखर वहिले यांनी ( Maval Vichar Manch ) मानले.