मावळ ऑनलाईन – विजेच्या शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत भाजल्याने युवकासह बालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना दि.30 जून 2025 सायंकाळी 7:15 वा. कोथुर्णे ता. मावळ हद्दीत घडली. यात दुकानातील फ्रीज, फॅन, टेबल व किराणा माल असे 2 लाखाचे साहित्य जळून खाक झाले.रविवारी (दि.6) रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
गणेश तुकाराम दळवी (वय 19) व विराज सचिन दळवी (वय 12 रा. कोथुर्णे ता. मावळ) असे आगीत भाजल्याने मृत्यू झालेल्या युवक व बालकाचे नाव आहे.
Sanatan Sanstha : सनातन संस्थेच्यावतीने देशभरात ७७ ठिकाणी, तर चिंचवड आणि तळेगाव येथे ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ होणार !
दुकानामध्ये गणेश दळवी व विराज दळवी बसले असता, अचानक विजेच्या शॉर्ट सर्किटने दुकान आग लागली. यात गणेश दळवी व विराज दळवी आगीत भाजल्याने त्यांना सुर्या सह्याद्री हॉस्पिटल कसबा पेठ पुणे येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यात उपचारादरम्यान गणेश दळवी याचा गुरुवार (दि.3) सायंकाळी 7 वा. मृत्यू झाला. विराज दळवी याचा रविवारी (दि.6) रात्री 10:30 वा. उपचारादरम्यान मृत्यू झाला.
Gahunje: डॉ. मीनल बोडके यांना सॅटेलाइट सिक्युरिटीमध्ये डॉक्टरेट
विराज दळवी हा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोथुर्णे येथे सहावी वर्गात शिकत होता, तो अतिशय मनमिळाऊ बोलका होता.गणेश दळवी याचा आयटीआय झाला होता घराला हातभार लावत होता. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.पुढील तपास कामशेत पोलीस करत. शासनाकडून योग्य ती मदत दळवी कुटुंबाला मिळण्याची मागणी परिसरातून केली जात आहे.