मावळ ऑनलाईन – मावळ तालुका पोल्ट्री योद्धा ( Maval Taluka Poultry Association) संघटनेची विशेष सभा वडगाव मावळ येथे संघटनेचे अध्यक्ष एकनाथ गाडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
या सभेस राज्य संघटक सोनबा गोपाळे गुरुजी, कार्याध्यक्ष सुभाष केदारी,सचिव प्रवीण शिंदे, सहसचिव महेश कुडले,उपाध्यक्ष संभाजी शिंदे,संभाजी केदारी तसेच उत्तम शिंदे,श्रीरंग सुतार,गणेश आलम,शिवाजी कारके,संतोष काजळे व दत्तात्रय निम्हण आदी पदाधिकारी उपस्थित होते.
सभेत राज्य शासनाने पोल्ट्री व्यवसायास कृषीचा दर्जा दिल्याबद्दल राज्य पोल्ट्री संघटनेचे अध्यक्ष अनिल खामकर,विलास साळवी तसेच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पशुसंवर्धन मंत्री यांचे अभिनंदन करणारा ठराव एकमताने मंजूर करण्यात ( Maval Taluka Poultry Association) आला.
तसेच पोल्ट्री व्यवसायिकांना सवलतीच्या दराने सौर ऊर्जा प्रकल्प उभारून द्यावेत अशी मागणी या सभेत करण्यात आली.पोल्ट्री व्यवसायिकांच्या विविध अडचणींवर चर्चा यावेळी करण्यात आली. आभार संभाजी केदारी यांनी ( Maval Taluka Poultry Association) मानले.



















