संघटन बळकटीसाठी महत्त्वाचा टप्पा
मावळ ऑनलाईन – भारतीय जनता पक्ष, पुणे जिल्हा (उत्तर) कडून मावळ तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक साठी प्रभारी नेमण्यात आले असून, पक्षाच्या ( Maval Taluka BJP) संघटनात्मक बळकटीसाठी ही नियुक्ती महत्त्वाची मानली जात आहे. भाजप पुणे जिल्हा (उत्तर) अध्यक्ष प्रदीप विद्याधर कंद यांच्या स्वाक्षरीने जारी झालेल्या पत्राद्वारे या नियुक्त्यांची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.
भारतीय जनता पार्टी पुणे जिल्हा (उत्तर)चे अध्यक्ष प्रदिप कंद यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने काही महत्वाच्या निवडी जाहीर केल्या आहेत. शुक्रवारी (दि. ३१) या निवडींची घोषणा करण्यात आली. त्यामध्ये मावळ तालुक्यात लोणावळा शहर नगरपालिकेच्या निवडणूक प्रभारी पदी महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
Vadgaon Maval News : यशवंतनगर ते कातवी रस्त्याची दुरावस्था
आगामी नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकाच्या अनुषंगाने ( Maval Taluka BJP) पक्षाकडून प्रभारींची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. त्यात मावळ तालुक्यात होऊ घातलेल्या लोणावळा नगरपरिषद,तळेगाव दाभाडे नगरपरिषद आणि वडगाव मावळ नगरपंचायत निवडणुकांसाठी प्रभारींची नियुक्ती पक्षाकडून जाहीर करण्यात आली आहे.
यामध्ये लोणावळा नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री संजय (बाळा) भेगडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या निवडणुकीचे प्रभारी म्हणून भाजपा किसान मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष गणेश किसनराव भेगडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर मावळ तालुका भाजपाचे प्रभारी म्हणून भास्करराव म्हाळसकर यांची नियुक्ती ( Maval Taluka BJP) करण्यात आली आहे.





















