मावळ ऑनलाईन – मावळ येथील टाकळी खुर्द या छोट्याशा गावामध्ये रिक्षा चालवणाऱ्या बाळासाहेब पिंपरे यांचा मुलगा पंकज पिंपरे हा सीए परीक्षा उत्तीर्ण झाला आहे. त्यामुळे मावळातील एक खेड्यातून हालाकीच्या परिस्थितीमध्ये घवघवीत यश मिळवल्याबद्दल पंकजचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.
सीए च्या मुख्य परीक्षेचा निकाल काल रविवारी (दि.6) लागला यावेळी अवघ्या 22 व्या वर्षी पंकज याने सीए च्या अंतिम परीक्षांमध्ये यश मिळवत मावळातील अनेक तरुणांना एक आदर्श निर्माण केला आहे.
पंकज याने त्याचे प्राथमिक शिक्षण टाकावे खुर्द येथील जिल्हा परिषद च्या शाळेमध्ये पूर्ण केले. तर पुढचे बारावीपर्यंतचे शिक्षण त्यांनी तुंगार्ली येथे घेतले. यावेळी आपले दहावीपर्यंतचे शिक्षण मराठी माध्यमातून झाल्याचे पंकज अगदी गर्वाने सांगतो पुढे त्याने बारावी कॉमर्स करत करत सीएच्या तयारीची इच्छा घरच्यांसमोर व्यक्त केली व तेव्हापासूनच त्याने सीए परीक्षेच्या तयारीला सुरुवात केली. वडील रिक्षा चालक असल्याने घरात आर्थिक व शैक्षणिक परिस्थिती देखील हालकीचे होते त्यामुळे पंकजांनी स्वतःचा मार्ग स्वतःच निवडत काही काळ इंटर्नशिप करत कमाई व अभ्यास असे एकत्रित सूत्र अवलंबले यामध्ये त्याने पीडब्ल्यूसी सारख्या नामांकित कंपनीमध्ये देखील काम केले व पुढे त्याने बँकिंग व फायनान्स मध्ये स्पेशलायझेशन करण्याचा निर्णय घेतला यावेळी त्यांनी जॉब मधून वेळ काढत तब्बल 16 ते 17 तास अभ्यास करत मी 2025 रोजी दिलेल्या परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळवत सीएला गवसणी घातली.
Charholi Budruk:युवराज शेलार यांचे आषाढी एकादशी निमित्त पालखी सोहळा व विठुरायाचे लक्षवेधक चित्र
मुलाच्या यशाबद्दल बोलताना बाळासाहेब पिंपरी म्हणाले की घरात हालकीची परिस्थिती असल्यामुळे मी त्याच्या शिक्षण खरंतर बारावीपर्यंतच करणार होतो मात्र मुलांनी जिद्द धरली त्यामुळे आज तो या यशापर्यंत पोहोचला आहे पण माझ्या मुलाच्या यशामुळे परिसरातील रिक्षा चालक देखील खुश झाले असून त्यांनी तेही आता त्यांच्या मुलांसाठी मोठे स्वप्न पाहत आहेत जे की खूप प्रेरणादायी वाटते.
Van Mahotsav: वन महोत्सवानिमित्त लीड अप इंटरनॅशनल प्री-स्कूलमध्ये 251 रोपवृक्षांचे वितरण!
पंकज मात्र आपल्या यशाबद्दल बोलताना माझ्या या यशामध्ये घरातील सर्वांचा वाटा असल्याचे आवर्जून सांगतो. तसेच इतर तरुणांना याबाबत मार्गदर्शन करताना तो म्हणतो की, आयुष्यात खूप स्पर्धा आहे. त्यात स्पर्धा परीक्षेसाठी जर तुम्ही तयारी करत असाल तर जे ध्येय ठरवले आहे त्यावर लक्ष केंद्रित करा. जराही वेळ वाया घालवू नका. कारण तुम्ही मागे पडलात तर इतर लोक तुमची जागा घेतील. त्यामुळे तुमच्या ध्येयाला पूर्ण वेळ द्या, या काळात तुम्हाला अपयश येईल ते अपयश पचवायला देखील शिका. यातूनच तुम्हाला यश मिळणार आहे,असा मोलाचा सल्लाही तो इतर तरुणांना देतो.