मावळ ऑनलाईन – मावळातील वळवंती या (Maval)गावात सरपंचाने च तरुणाला जीवघेणी मारहाण केली आहे. याप्रकरणी कामशेत पोलीस ठाण्यात नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गावातील मंदिरासमोर रविवारी (दि.10) रात्री साडेनऊच्या सुमारास घडली.
याप्रकरणी कामशेत पोलिस ठाण्यात स्वप्निल तुकाराम शिंदे (वय 26) यांनी फिर्यादी आहे. फिर्यादीवरून गावचे सरपंच रोहिदास जांभूळकर साथीदार तुषार जांभुळकर, अभिषेक जांभुळकर, दिलीप जांभुळकर, रामदास जांभुळकर,अमोल रगडे, प्रमेश जांभुळकर, बाळा शिंदे व बाळा जांभुळकर या 9 जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत शुभम दत्तात्रय डेनकर हा तरुण गंभीर जखमी झाला आहे.
PCMC: शाडू मातीच्या गणेश मूर्तींना नदी विसर्जनाची परवानगी द्यावी – माजी नगरसेवक विजय शिंदे यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी
Lonavala:घरगुती गॅस टाकी चोरणारा चोरटा झाला गजाआड
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,फिर्यादी व शुभम हे गावात मंदिरासमोर थांबले असताना आरोपी व त्यांचे साथीदार हातात लोखंडी रोड व काठी घेऊन तिथे आले त्यावेळी त्यांनी अशी वेगळं करत मारहाण करण्यास सुरुवात केली यावेळी त्यांनी गार्डनच्या काचाही फोडल्या व जिवे मारण्याच्या उद्देशाने आरोपी सरपंच रोहिदास जांभूळकर याने शुभमच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण केली. यावरून कामशेत पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.