मावळ ऑनलाईन – मावळ तालुक्यातील महसूल विभागाचे सर्व ( Maval News) कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्र राज्य महसूल सेवक संघटनेच्या आवाहनाला प्रतिसाद देत मंगळवार (दि. 23) पासून बेमुदत काम बंद आंदोलनाला सुरुवात केली आहे. महसूल सेवकांना चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा, या प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन छेडण्यात आले आहे.
या आंदोलनामुळे मावळ तहसील कार्यालयासह संपूर्ण तालुक्यातील महसुली कामकाज ठप्प झाले आहे. महसूल मंत्री यांच्या सूचनेनुसार सध्या सुरू असलेला “सेवा पंधरवडा” कार्यक्रमही या संपामुळे विस्कळीत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे शेतकरी, ग्रामीण भागातील नागरिक तसेच महसुलाशी संबंधित तातडीची कामे प्रलंबित राहून मोठी गैरसोय निर्माण झाली ( Maval News) आहे.
Rashi Bhavishya 25 Sept 2025 : कसा जाईल आपला आजचा दिवस?
संघटनेच्या नेत्यांनी तहसीलदार विक्रम देशमुख यांना निवेदन देऊन, मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा दिला आहे. संघटनेचे अध्यक्ष सोमनाथ कालेकर, उपाध्यक्ष विठ्ठल पाठारे, कार्याध्यक्ष रामदास कदम, संभाजी कोठे, सागर जाधव, श्रीपती गायकवाड, ( Maval News) गणेश लांडगे, गणेश टिळेकर, चंद्रकांत तळपे व राहुल विधाटे या आंदोलनावेळी उपस्थित होते.
मेळाव्यात बोलताना संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, महसूल सेवकांना न्याय मिळेपर्यंत संप मागे घेतला जाणार नाही. शासनाने लवकरच मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेतला नाही, तर आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी दिला ( Maval News) आहे.
या संपामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांची कागदपत्रे, जमिनीचे व्यवहार, उत्पन्न, जात व इतर दाखले, तसेच विविध शासकीय योजनांसाठी आवश्यक असलेली कागदपत्रे नागरिकांना वेळेत मिळण्यास अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे शासनाने तत्काळ या प्रश्नाकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे नागरिकांकडून व्यक्त होत ( Maval News) आहे.