situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Maval News : पवन मावळमध्ये रिंगरोड व टीपी प्लॅनला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध; भूमी हडपल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा

Published On:
Maval News

मावळ ऑनलाईन – पवन मावळातील सांगवडे, साळुंब्रे, दारुंब्रे, धामणे, गोडुंब्रे व नेरे या गावांमध्ये पीएमआरडीएने रिंगरोड आणि टीपी (टाऊन प्लॅनिंग) योजनेसाठी( Maval News) शेतजमिनी अधिग्रहित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या निर्णयाला स्थानिक शेतकऱ्यांनी जोरदार विरोध केला असून, हे आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहेत.

पीएमआरडीएच्या प्रस्तावित योजनेनुसार, संबंधित गावांतील( Maval News) सुमारे 50 टक्के जमीन शेतकऱ्यांकडून घेतली जाणार आहे. उर्वरित 50 टक्के जमीन शेतकऱ्यांकडे राहील, असा दावा प्रशासनाने केला असला तरी शेतकरी या आश्वासनांवर विश्वास ठेवायला तयार नाहीत. “या भागातील साखर कारखाना हा आमच्या श्रमावर उभा राहिलाय. जर जमीनच राहिली नाही, तर ना शेती टिकेल ना कारखाना,” अशी प्रतिक्रिया संतप्त शेतकऱ्यांनी दिली.

Sunil Shelke : मावळ तालुक्यातील उद्यान विकासासाठी ४ कोटींचा निधी

सध्या सांगवडे नदीवर नवीन पूल उभारला जात आहे, ज्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना काहीसा फायदा होणार आहे. मात्र अशा वेळी टीपी योजना व रिंगरोडची गरजच काय? असा प्रश्न स्थानिक उपस्थित करत आहेत. “गरज नसताना केवळ बिल्डर लॉबीला फायदा व्हावा म्हणूनच या योजना रेटून लावल्या जात आहेत,” असा आरोप शेतकरी करत आहेत.

शेतकऱ्यांचा ठाम आरोप आहे की, रिंगरोड व टीपी योजनांच्या ( Maval News)आडून बिल्डरांच्या हितसंबंधांना खतपाणी घालण्याचा डाव पीएमआरडीएने रचला आहे. “आमच्या जमिनी बळकावून बिल्डरांच्या घशात घालण्याचे हे षड्यंत्र आहे. याला आम्ही कडाडून विरोध करू. आंदोलनाची तयारी पूर्ण झाली आहे. गरज पडल्यास छातीवर गोळ्या झेलण्यासही मागेपुढे पाहणार नाही,” असा निर्धार शेतकऱ्यांनी व्यक्त केला.

Gajanan Mehendale : ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांना अखेरचा निरोप

या आंदोलनाला स्थानिक नेत्यांचा देखील सक्रिय पाठिंबा आहे. मावळचे आमदार सुनील शेळके, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, तसेच खासदार श्रीरंग बारणे यांनी( Maval News) पाठिंबा दिला आहे,असा दावा शेतकऱ्यांनी केला आहे.

शेतकऱ्यांनी पर्यायही सुचवला आहे

६५ मीटर रुंद रिंगरोडऐवजी मुळशी तालुक्यातून येणारा ४५ मीटर रुंद रस्ता हिंजवडी, मारूंजी, नेरे, कासरसाई व चांदखेड मार्गे पीएमआरडीसीच्या ११० मीटरच्या महामार्गाशी जोडावा. “हा पर्याय स्वीकारण्यात आला तरच आम्ही शांत राहू. ( Maval News) अन्यथा आंदोलन अटळ आहे,” असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

Follow Us On