मावळ ऑनलाईन –मावळ पंचायत समितीच्या निवडणुकीची आरक्षण सोडत सोमवारी (दि १३) सकाळी ११ वाजता वडगाव मावळ येथील भेगडे लॉन्समध्ये काढण्यात आली. यामध्ये दहा जागांपैकी पाच जागा महिलांकरिता आरक्षित झाल्यांने तालुक्यात महिलाराज सुरू होणार असल्याने महिला वर्गात मोठ्या उत्साहाचे व आनंदाचे वातावरण आहे.
मावळचे प्रांत अधिकारी सुरेंद्र नवले, तहसीलदार विक्रम देशमुख व (Maval)नायब तहसीलदार गणेश तळेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते चिठ्ठ्या काढून सोडत काढण्यात आली.
मावळ पंचायत समितीचे एकूण १० गण असून यामध्ये
Talegaon Dabhade:राव कॉलनी मध्ये खेळ रंगला पैठणीचा कार्यक्रमाचा आनंद
Gold-Price: सोनं-चांदी पुन्हा महागले
गण. आरक्षण
टाकवे बुद्रुक. -सर्वसाधारण स्त्री
नाणे. – अनुसूचित जमाती स्त्री
वराळे. – सर्वसाधारण
इंदोरी- सर्वसाधारण
खडकाळे- अनुसूचित जाती
कार्ला – सर्वसाधारण स्त्री
कुसगाव बुद्रुक- सर्वसाधारण
काले – सर्वसाधारण स्त्री
सोमाटणे – नागरिकांचा मागास प्रवर्ग
चांदखेड- नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री
असे आरक्षण सोडती निघाल्या. यावेळी भेगडे लॉन्स कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणावर राजकीय पक्षाचे पदाधिकारी आणि इच्छुक उमेदवारांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.
मावळ तालुक्यातील जिल्हा परिषदेचे गटाचे आरक्षण पुढीलप्रमाणे
गट. आरक्षण
टाकवे बुद्रुक – अनुसूचित जमाती पुरुष
इंदोरी – सर्वसाधारण महिला
खडकाळे – सर्वसाधारण महिला
कुसगाव – सर्वसाधारण पुरुष
सोमाटणे – सर्वसाधारण महिला
राजकीय हालचालींना वेग
आरक्षण जाहीर झाल्यानंतर तालुक्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. इच्छुकांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. पक्षश्रेष्ठी आणि तालुक्यातील पक्षाचे प्रभारी यांच्याकडे आपल्या नावाची शिफारस केली जात आहे. मागील काही दिवसांत मावळ तालुक्यात बदललेली राजकीय समीकरणे पाहता भाजप आणि राष्ट्रवादी (अजित पवार) या महायुती मधील दोन घटक पक्षांमध्ये चुरस लागण्याची शक्यता आहे.