मावळ ऑनलाईन – मावळ तालुका मराठी पत्रकार संघाच्यावतीने ( Maval Jansanvad) मावळवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडण्याच्या उद्देशाने ‘ संवाद जनतेशी, वार्तालाप पत्रकारांशी ‘ हा उपक्रम राबविण्यात येणार असून या उपक्रमाचा शुभारंभ पवन मावळ पूर्व भागात करण्यात येणार असल्याची माहिती संघाचे अध्यक्ष सुदेश गिरमे, कार्याध्यक्ष विशाल विकारी, सचिव रामदास वाडेकर, प्रकल्पप्रमुख गणेश विनोदे यांनी दिली.
Wagholi Lift Accident : वाघोलीत लिफ्ट कोसळली; सहा जण जखमी, रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण
‘ संवाद जनतेशी, वार्तालाप पत्रकारांशी ‘ या उपक्रमाचा शुभारंभ बुधवार दि.१७ रोजी पवन मावळ पूर्व भागातील नागरिकांच्या रिंग रोड व टी पी प्लॅन या प्रश्नाबाबत वार्तालाप करून करण्यात येणार आहे.
पवन मावळ पूर्व भागातील साळुंब्रे, सांगावडे, धामणे, गहुंजे, गोडुंब्रे, दारुंब्रे या भागात प्रामुख्याने रिंग रोड व टी पी प्लॅन या प्रश्नांमुळे नागरिक हैराण झाले असून याबाबत लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत बैठका, शासन दरबारी पाठपुरावा करूनही प्रश्न सुटलेला ( Maval Jansanvad) नाही.
NCP Maval : बबनराव भेगडे व त्यांचे सहकारी समर्थक राष्ट्रवादीतच
त्यामुळे हतबल झालेल्या सबंधित गावातील ग्रामस्थांशी याबाबत थेट संवाद ( Maval Jansanvad) साधून वार्तालापाच्या माध्यमातून या प्रश्नांना वाचा फोडण्याचा प्रयत्न मावळ तालुका मराठी पत्रकार संघाच्या माध्यमातून सर्व पत्रकार बांधव करणार आहेत.
सबंधित सर्व गावातील ग्रामस्थांनी आपल्या गावात, आपल्या दारात येऊन ( Maval Jansanvad) संवाद साधणाऱ्या पत्रकार बांधवांना आपणास भेडसावणाऱ्या, आपल्या दृष्टीने अन्यायकारक असलेल्या समस्या स्पष्टपणे सांगाव्यात व पत्रकार संघाच्या या उपक्रमास सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
या उपक्रमाचे नियोजन संघाचे सल्लागार सुरेश साखवळकर, सोनबा गोपाळे, ज्ञानेश्वर वाघमारे, विलास भेगडे, निखिल कवीश्वर, रमेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपाध्यक्ष आमिन खान, भारत काळे, खजिनदार संकेत जगताप, कायदेशीर सल्लागार किशोर ढोरे, कार्यकारी सदस्य सचिन शिंदे, ज्ञानेश्वर ठाकर, चैत्राली राजापूरकर, मुकुंद परंडवाल, पदसिद्ध सदस्य विशाल पाडाळे, अतुल पवार, रेश्माताई फडतरे, चेतन वाघमारे, रवी ठाकर, रमेश कांबळे व सर्व सभासद करत ( Maval Jansanvad) आहेत.