situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Maval: मावळ तालुका वारकरी मंडळाच्या अध्यक्षपदी हभप विठ्ठल महाराज पांडे

Published On:

मावळ ऑनलाईन – मावळ तालुका वारकरी मंडळाच्या (Maval)अध्यक्षपदी सावंतवाडी (महागाव) चे हभप विठ्ठल महाराज पांडे यांची नियुक्ती करण्यात आली.

यावेळी संस्थापक हभप नारायण केंडे, संघटक हभप दिनकरबुवा निंबळे, हभप संजय महाराज ढोरे, हभप निवृत्ती कालेकर, हभप खंडु भोते, हभप राजु मिस्री, हभप दत्ता कालेकर यांसह अनेक वारकरी उपस्थित होते.

मावळ तालुका वारकरी मंडळाच्या अध्यक्ष पदाची जागा काही महिने रिक्त होती. अध्यक्षपदाच्या निवडीसाठी सोमवारी (दि२५) दुपारी ४:०० वा. पवनानगर येथील मारुती मंदिरामध्ये बैठक आयोजित केली होती.

Lonavala: लोणावळ्यात यंदा पावसाचा 200 इंचांचा टप्पा पार

PMPML : गणेशोत्सवात पीएमपीएमएल बस मार्गांमध्ये बदल

त्यात सर्वानुमते मावळ तालुक्यातील ज्येष्ठ किर्तनकार रामायणाचार्य हभप विठ्ठल महाराज पांडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. हभप पांडे महाराजांना मंडळाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचे उपस्थितीत निवडीचे पत्र देण्यात आले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पांडे महाराजांना शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

मावळ तालुका वारकरी मंडळाच्या स्थापनेपासून गेल्या तिन वर्षात गोरगरीब वारकऱ्यांना अन्नधान्याचे किट, गरजु वारकरी रुग्णांना मदत, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, देवदर्शन यात्रा, बालसंस्कार शिबीर, वृक्षारोपण असे अनेक उपक्रम राबविले जातात. यासह मंडळाचा नावलौकीक वाढविण्यासाठी भरीव कार्य करण्याचा संकल्प नवनिर्वाचित अध्यक्ष हभप विठ्ठल महाराज पांडे यांनी निवडीप्रसंगी बोलताना व्यक्त केला.

ह भ प पांडे महाराजांच्या निवडीने पवन मावळ परिसरात अभिनंदन व कौतुकाचे वर्षाव होत आहे.

लवकरच वारकरी मंडळाची पुढील बैठकीचे आयोजन करण्यात येणार असून त्यामध्ये मंडळाच्या नूतन पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्यांची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे मंडळाचे संघटक हभप दिनकरबुवा निंबळे यांनी सांगितले.

Follow Us On