situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Maval: मावळात ललिता पंचमी निमित्त भव्य कुंकुमार्चन सोहळा – हजारो महिलांचा उत्स्फूर्त सहभाग

Updated On:
maval

मावळ ऑनलाईन –शारदीय नवरात्रोत्सवाच्या ललिता पंचमी निमित्त (Maval)मावळ तालुक्यातील इंदोरी येथे प्रथमच सामुदायिक कुंकुमार्चन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. प्रशांतदादा भागवत युवा मंच यांच्या पुढाकाराने झालेल्या या ऐतिहासिक सोहळ्याला तालुक्यातील विविध भागांतून हजारो महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

या सोहळ्यातील मुख्य आकर्षण होते कालिपुत्र कालीचरण महाराजांची महाआरती. त्यांच्या आरतीवेळी संपूर्ण परिसर भक्तिरसात दंग झाला. त्यासोबतच शाहीर हरिदासजी शिंदे यांच्या संबळ वादक आणि शिवकालीन गोंधळी यांच्या सादरीकरणाने वातावरण अधिकच दैवी व मंत्रमुग्ध झाले.

महिलांनी पारंपरिक नऊवारी साड्या परिधान करून, माथ्यावर फुलांचे गजरे माळून, ओवाळणीसाठी ताट घेऊन मोठ्या संख्येने या सोहळ्यात हजेरी लावली. देवीसमोर ओवाळणी करून एकमेकींच्या कपाळावर कुंकू लावून सौभाग्य, सुख व समृद्धीचे आशीर्वाद मागण्यात आले. “जय भवानी, जय जिजाऊ”, “अंबे मात की जय” अशा घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले.

महिलांचा उत्साह आणि गावाच्या प्रत्येक चौकात फुलांनी केलेली सजावट यामुळे इंदोरी गाव पूर्णपणे भक्तिमयतेने न्हाऊन निघाले होते. देवीच्या चरणी नारळ, फुले व कुंकवाची वाहिली अर्पण करत सर्वत्र भक्तिभावाचे वातावरण होते.

Vadgaon Maval: युवकांच्या सक्षमतेवर देशाची सक्षमता अवलंबून – पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल

Pune Airport: पुणे विमानतळावर ई-मेलद्वारे बॉम्बची धमकी; तपासानंतर अफवा असल्याचे उघड

या कार्यक्रमाला मावळचे आमदार सुनील आण्णा शेळके व त्यांच्या पत्नी सारिका शेळके, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, महिला तालुकाध्यक्ष सुवर्णा राऊत, सभापती ज्योती शिंदे, उपसरपंच बेबी बैकर, अनुपमा खांडगे, मेघा भागवत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते, आजी-माजी पदाधिकारी, पोलीस प्रशासन व हजारो नागरिकांनी सहभाग नोंदविला.

जगदीश कुलकर्णी महाराज, शाहीर हरिदासजी शिंदे, धनंजय दाभाडे, सरपंच शशिकांत शिंदे, उद्योजक संकेत शिंदे, रामदास शिंदे, बबन आल्हाट, भरत घोजगे, सुनील वाळुंज, नंदकुमार शेलार, भानुदास दरेकर, सुनील दाभाडे, बाबासाहेब घोजगे, प्रदीप बनसोडे, चंद्रकांत भागवत, उपसरपंच संदीप ढोरे, दिनेश चव्हाण, आशिष ढोरे, नितीन ढोरे, अंकुश ढोरे, अनिल राऊत, नंदकुमार भागवत आदी मान्यवरांच्या उपस्थितीने सोहळा भव्यतेने पार पडला.

प्रशांत भागवत यांची दूरदृष्टी व उपक्रमशीलता यामुळे प्रथमच एवढ्या भव्य आणि दिव्य पद्धतीने कुंकुमार्चन सोहळा आयोजित करण्यात आला. त्यांच्या प्रयत्नामुळे मावळ तालुक्यातील महिलांसाठी हा सोहळा अविस्मरणीय ठरला. महिला एकता, भक्तीभाव आणि पारंपरिक संस्कृतीचा संगम या उपक्रमातून घडल्याने तालुक्याच्या धार्मिक-सांस्कृतिक परंपरा अधिक भक्कम होणार असल्याचा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

या उपक्रमामुळे प्रशांत भागवत युवा मंचाने पुन्हा एकदा “सामाजिक-सांस्कृतिक चळवळीत आघाडी” घेतल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून आले असून, मावळ तालुक्याच्या सांस्कृतिक नकाशावर इंदोरी गावाने नवा ठसा उमटविला आहे.

हजारो महिलांचे आभार व्यक्त करताना प्रशांत भागवत म्हणाले -“मावळ तालुक्यातील प्रत्येक भगिनींनी एवढ्या उत्स्फूर्ततेने या कुंकुमार्चन सोहळ्यात सहभागी होऊन आमचं आयोजन यशस्वी केलं. पण माझ्यासाठी खऱ्या अर्थाने कार्यक्रम तेव्हाच यशस्वी झाला, जेव्हा हजारो महिलांनी भक्तिभावाने सहभागी होऊन सुरक्षितपणे, व्यवस्थित त्यांच्या घरी परतल्या. आज या सोहळ्यामुळे देवीची कृपा आपल्या सर्वांवर राहो आणि मावळ तालुका संस्कृती, भक्ती आणि परंपरेत अधिक समृद्ध होवो, हीच माझी प्रार्थना आहे.”

Follow Us On