situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Maval Forest Division : मावळ तालुक्यातील वन विभागाच्या जागेत देवराई लावणार देशी वृक्ष

Published On:
Sahyadri Devrai Foundation

मावळ ऑनलाईन – मावळ तालुक्यातील वन विभागाच्या ( Maval Forest Division) जागेत सह्याद्री देवराई फाउंडेशन संस्थेच्या माध्यमातून देशी वृक्षांची लागवड केली जाणार आहे. पायलट प्रोजेक्ट म्हणून सुरुवातीला गहुंजे येथील दोन हेक्टर जागेतील विदेशी झाडे काढून त्या ठिकाणी पिंपळ, वड, उंबर, कडूलिंब, जांभूळ, आंबा यांसारखे देशी वृक्ष लावले जाणार आहेत. महाराष्ट्राच्या पश्चिम घाटातील जैवविविधता जोपासण्यासाठी वन विभागाने हा निर्णय घेतला असून देशी वृक्षांमुळे जमिनीची धूप, पाण्याची पातळी संतुलित होण्यासाठी मदत होणार आहे.

Alandi : श्री ज्ञानेश्वरी परिष्करण दिन निमित्त माऊलीं मंदिरात पारायण व कीर्तन सोहळा

गहुंजे येथील घोरावडेश्वर डोंगराच्या पाठीमागील बाजूला वन प्रतिबंधित क्षेत्र ( Maval Forest Division) क्रमांक ९१ आणि ९४ मधील दोन हेक्टर जागेत हा प्रकल्प राबवला जाणार आहे. दोन हेक्टर जागेतील सुमारे दोन हजार विदेशी झाडे तोडली जातील. त्यामध्ये ग्लिरिसीडिया, सुबाभूळ झाडांचा सर्वाधिक समावेश आहे. या कामासाठी वन विभाग आणि सिने अभिनेते सयाजी शिंदे संचालित सह्याद्री देवराई फाउंडेशन यांच्यात करार झाला आहे.


Srujan Foundation आईच्या ऋणातून उतराई होता येत नाही- सचिन महाराज पवार

मावळ तालुक्यात मोठ्या प्रमाणात वन विभागाचे( Maval Forest Division) क्षेत्र आहे. वडगाव आणि शिरोता असे दोन वन परिक्षेत्र तालुक्यात आहेत. इथल्या डोंगररांगांमध्ये ग्लिरिसीडिया सारखे विदेशी वृक्ष मोठ्या प्रमाणात आहेत. विदेशी झाडांच्या खालच्या बाजूला कोणतीही झाडे येत नाहीत. त्यामुळे जैवविविधता जोपासण्यासाठी अनेक मर्यादा येतात. विदेशी वृक्षांमुळे पाणी शोषून घेण्याची क्षमता असंतुलित होते. जमिनीची धूप, पाण्याची टंचाई झाल्याने पक्षी आणि प्राण्यांच्या अधिवासावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे देशी वृक्षांचे महत्व वाढले आहे.

गहुंजे येथे वन विभागाचे( Maval Forest Division) सुमारे १३२ हेक्टर क्षेत्र आहे. त्यातील दोन हेक्टर जागेत सह्याद्री देवराई फाउंडेशन, आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून प्रायोगिक तत्वावर देशी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत वृक्ष लागवड पूर्ण केली जाणार आहे. दोन हेक्टर जागेत किती वृक्ष लागवड केली जाणार, याबाबत आकडा निश्चित करण्यात आला नाही. ही संस्था पुढील पाच वर्ष लावलेल्या वृक्षांचे संगोपन करणार आहे. त्यामुळे केवळ लागवड करून सोडून देणे असे होणार नाही.

देशी वृक्ष लागवडीचे फायदे ( Maval Forest Division)

  • पर्यावरण संतुलन राहील
  • जमिनीधूप कमी होईल
  • हवेतील प्रदूषण शोषून घेण्याची क्षमता वाढेल
  • स्थानिक जैवविविधता जोपासण्यास मदत होईल
  • पक्षी, प्राण्यांना नैसर्गिक अधिवास उपलब्ध होईल
  • भूजल पातळी वाढेल

वन परिक्षेत्र वडगाव मावळमधील गहूंजे डोंगर परिसरातील विदेशी प्रजातीची झाडे काढून तिथे देशी वृक्ष लावले जात आहेत. पुढील एक महिन्याच्या आत हे काम पूर्ण केले जाईल. सह्याद्री वनराई फाउंडेशन कडून या वृक्षांची पुढील पाच वर्ष निगा राखली जाईल. पश्चिम घाटातील ( Maval Forest Division) जैवविविधता टिकवून ठेवण्यासाठी हा उपक्रम राबवला जात आहे.

– प्रकाश शिंदे, वनपरिक्षेत्र अधिकारी, वडगाव मावळ.

Follow Us On