मावळ ऑनलाईन –मराठा समाजाला आरक्षण मिळावे या (Maval)मागणीसाठी सकल मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यासह हजारो मराठा बांधव मुंबईच्या दिशेने जात आहेत. मराठा बांधव गुरुवारी (२८ ऑगस्ट) तळेगाव मार्गे मुंबईच्या दिशेने गेले. दरम्यान रस्त्यात मावळ तालुक्यातील गावागावांमध्ये आंदोलकांच्या चहा, नाश्ता, जेवणाची सोय करण्यात आली.
मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वातील (Maval)मोर्चा शुक्रवारी (२९ ऑगस्ट) मुंबई मधील आझाद मैदान येथे पोहोचणार आहे. हा मोर्चा गुरुवारी जुन्नर येथून तळेगाव मार्गे मुंबईच्या दिशेने गेला. या आंदोलनात मावळ तालुक्यातील हजारो मराठा बांधव सहभागी झाले. आंदोलनामध्ये राज्यभरातून हजारो वाहनांमधून मराठा समाज बांधव मुंबईच्या दिशेने जात आहेत. मावळ तालुक्यातून जात असताना महामार्गालगत असलेल्या गावांमध्ये आंदोलकांच्या चहा, नाश्ता, जेवणाची व्यवस्था करण्यात आली.
Atharvashirsha Pathan : श्रीसमर्थ सेवा समिती व श्री योगीराज सेवा फाउंडेशनच्यावतीने बालगोपालांसाठी गणपती अथर्वशीर्ष पठणाचे आयोजन
Pune: बाल गणेश कोथरूड फेस्टिव्हलला सुरुवात


पिण्याचे पाणी, भाजी, भाकरी तसेच नाश्त्यासाठी पोहे, उपीट आदींचे वाटप महामार्गावर जागोजागी करण्यात आले. इंदोरी, तळेगाव, वडगाव फाटा, वडगाव (माळीनगर), जांभूळ फाटा, कान्हे फाटा, कामशेत, कार्ला आदी भागांमध्ये हे वाटप करण्यात आले. मावळ मध्ये जरांगे पाटील यांच्या मोर्चाचे तालुक्यातील मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले.
हॉटेल व्यावसायिक अतुल वायकर यांनी त्यांच्या हॉटेल मध्ये सुमारे तीन हजार समाज बांधवांना मोफत जेवण दिले. हजारो लोकांना चहा, नाश्ता आणि पाणी वाटप केले. तळेगाव नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष गणेश काकडे यांनी सुमारे १३ हजार लोकांना पाणी, चहा, नाश्त्याचे वाटप केले. आपल्या समाज बांधवांना बळ देण्यासाठी हा उपक्रम ठिकठिकाणी राबवला जात असल्याचे गणेश काकडे यांनी सांगितले.