मावळ ऑनलाईन – मावळातील नायगाव येथे शॉर्टसर्किटमुळे( Maval Fire News) नवीन शॉपिंग सेंटर मधील तीन दुकाने जळून खाक झाली आहेत. ही घटना आज पहाटे तीनच्या सुमारास घडली.
पहाटे सव्वा तीनच्या सुमारास एका नागरिकाला दुकानातून धूर येत असून शटर लाल झाल्याचे दिसले. त्याने त्वरित दुकान मालकाला फोन करून या संबंधित माहिती दिली. घटनास्थळी वडगाव मावळ व तळेगाव एमआयडीसी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या होत्या.त्यांनी तासाभरात ही आग आटोक्यात ( Maval Fire News) आणली.
Alandi : इंद्रायणी नदीपात्रात वाहत जाणाऱ्या युवकास आपत्ती व्यवस्थापना कडून जीवदान
टोनी द ढाबा समोर असलेल्या नवीन शॉपिंग सेंटर मध्ये( Maval Fire News) श्री गजानन इलेक्ट्रॉनिक अँड कार टेप सेल, एकविरा मटण खानावळ व त्याच्या शेजारील आणखी एक अशी तीन दुकाने या आगीत जळून खाक झाली आहेत. या आगीत कोणीही जखमी झाले नाही मात्र संबंधित दुकान मालकांचे मात्र लाखोंचे नुकसान झाले आहे.
Alandi : इंद्रायणी नदीपात्रात वाहत जाणाऱ्या युवकास आपत्ती व्यवस्थापना कडून जीवदान
यावेळी स्थानिक नागरिकांनी महावितरणच्या गलथान कारभारावर बोट ठेवत आठ ते दहा वर्षे झाले तरी येथील पोल व तारा संबंधित कोणतीही दुरुस्ती होत नसल्याची तक्रार ( Maval Fire News) केली.