मावळ ऑनलाईन – मावळ तालुक्यातील तिकोनापेठ येथे एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली ( Maval Crime News) आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. ही घटना ५ मे ते १० मे दरम्यान आरोपीच्या घरात घडली.
Maval Crime News : धारदार शस्त्राने वार करत एकाचा खून
रमेश रामदास वाघमारे (रा. तिकोनापेठ, पवनानगर, मावळ) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद ( Maval Crime News) दिली आहे.
Alandi : आषाढी वारीतील वारकऱ्यांना स्वराज ग्रुपतर्फे पाण्याचे वाटप
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीला पीडित मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती असतानाही, त्याने तिला घरात बोलावून तिच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. घडल्या प्रकाराबाबत पीडित मुलीने तिच्या पालकांना माहिती दिली. त्यानंतर पालकांनी पोलिसात धाव घेत गुन्हा नोंदवला. लोणावळा ग्रामीण पोलीस तपास करीत ( Maval Crime News) आहेत.