मावळ ऑनलाईन – बेकायदेशीर पिस्टलबाबत पोलिसांना माहिती दिल्याचा राग धरून बांधकाम व्यावसायिकास दगड व लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आली. घटना २३ जून रोजी सकाळी ९.३० वाजता मावळ तालुक्यातील कातवी येथे घडली.
विशाल माणिक चव्हाण (४२, कातवी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. अशोक रघुनाथ चव्हाण (४९, कातवी) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
Pavana Dam : पवना धरण ४८ टक्के भरले; मावळ परिसरात दमदार पाऊस
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीकडे बेकायदेशीर पिस्टल असल्याची माहिती अशोक चव्हाण यांनी पोलिसांना दिली होती. त्यामुळे आरोपीने रागात येऊन लाकडी दांडक्याने व दगडाने अशोक चव्हाण यांच्या डोक्यात व हातावर मारहाण केली. यामध्ये चव्हाण हे गंभीर जखमी झाले. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.