मावळ ऑनलाईन – टँकर मधील पांढरे रॉकेल चोरी करत असताना वडगाव मावळ( Maval Crime News) पोलिसांनी एकाला अटक केली आहे तर घटनास्थळावरून दोघेही पसार झाले आहेत. ही घटना कान्हे फाटा येथील सूर्य ढाबाच्या पार्किंगमध्ये 26 ते 27 ऑगस्ट या कालावधीत घडली आहे.
Ganeshotsav : श्री पोटोबा महाराज देवस्थानसह ३० गणेशोत्सव मंडळामध्ये श्री गणेशाची प्रतिष्ठापना
याप्रकरणी वडगाव मावळ पोलीस ठाण्यात गंगाराम कोंडीबा इंगळे (रा.घाटकोपर ) यांनी फिर्यादी दिली आहे. फिर्यादीवरून पोलिसांनी नागेश लक्ष्मण शिंदे (वय 38 रा. घणसोली, नवी मुंबई) याला अटक केली असून त्याचे इतर दोन साथीदार यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात ( Maval Crime News)आला आहे.
Pune: बाल गणेश कोथरूड फेस्टिव्हलला सुरुवात
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा टँकर चालक असून ते व त्याचे साथीदार यांनी मिळून कान्हे येथील मुंबई पुणे महामार्गावर सूर्या ढाबाच्या समोर पार्किंग केलेल्या टँकरचे सील तोडून टँकरमधून पांढऱ्या रंगाचे रॉकेल चोरण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. तर इतर साथीदार हे तेथून पसार झाले आहेत. याचा पुढील तपास वडगाव मावळ ( Maval Crime News) पोलीस करत आहेत.