रंजना सुरेश गायकवाड यांची कार्ला पंचायत समिती गणाची उमेदवारी जाहीर
मावळ ऑनलाईन – तळेगाव येथे ईशा हॉटेलमध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये ( Maval BJP ) मोठ्या उत्साहात पक्ष प्रवेश सोहळा संपन्न झाला. शिवसेना उबाठा गटाचे पुणे जिल्हा उपप्रमुख सुरेश गायकवाड व कै. शिवराममामा येवले यांचे जावई व प्रसिद्ध बैलगाडा मालक सुरेश हुकाजी गायकवाड व माजी सरपंच वेहेरगाव रंजनाताई सुरेश गायकवाड यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांसोबत माजी राज्यमंत्री संजय तथा बाळाभाऊ भेगडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भाजपमध्ये त्यांनी जाहीर प्रवेश केला.
यावेळी निवृत्ती शेटे, चंद्रकांत शेटे, माऊली शिंदे, बाबुराव वायकर, किशोर भेगडे, बाळासाहेब नेवाळे, जितेंद्र बोत्रे, सायली बोत्रे, गणेश गायकवाड, अनिल गायकवाड, चिराग खांडगे आदी मान्यवर उपस्थित होते.
Today’s Horoscope, Tuesday : आजचे राशीभविष्य – मंगळवार, ४ नोव्हेंबर २०२५
गायकवाड दाम्पत्यांसह सुनील गायकवाड, एकनाथ गायकवाड, प्रवीण गायकवाड, ( Maval BJP ) स्वप्निल पडवळ,उमेश पडवळ, आकाश तिकोने, शुभम गायकवाड, हिंदूराज कोंडभर, संकेत गायकवाड, जालिंदर गायकवाड, पवन गायकवाड, अक्षय गायकवाड, अमित गायकवाड, गणेश गायकवाड, दीपक राऊत, रमेश पडवळ, नवनाथ गायकवाड आदीं वेहेरगाव ग्रामस्थांनी प्रवेश केला.
यावेळी कोअर कमिटी अध्यक्ष निवृत्तीभाऊ शेटे यांनी महत्त्वाची घोषणा करत कार्ला पंचायत समिती गणा मध्ये सौ. रंजनाताई सुरेश गायकवाड यांची उमेदवारी जाहीर केली.या निर्णयाचे कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले.गायकवाड दाम्पत्यांच्या प्रवेशामुळे स्थानिक राजकारणात नवा उत्साह निर्माण झाला आहे.
या कार्यक्रमाला भाजपचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने ( Maval BJP ) उपस्थित होते.



















