मावळ ऑनलाईन – सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल मावळ तालुक्याचे सुपुत्र भजनसम्राट ह.भ.प. नंदकुमार शेटे महाराज यांना जनकल्याण सामाजिक सेवा संस्था (कोल्हापूर) या भारत सरकार संलग्न व महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त संस्थेमार्फत “महाराष्ट्र भूषण” या राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले.
हा सन्मान समारंभ येत्या रविवारी (दि. १२ ऑक्टोबर) रोजी कोल्हापूर (Maval) येथे देण्यात आला. या सोहळ्यात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष उदयसिंह पाटील तसेच गोरक्षक ह.भ.प. भगवान महाराज कोकरे, जे ११०० गाईंची गोशाळा चालवतात, यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार प्रदान केला. या प्रसंगी संस्थेचे सर्व पदाधिकारी, पाहुणे व मोठा जनसमुदाय उपस्थित होता.
पुरस्काराचे स्वरूप कोल्हापुरी फेटा, सन्मानचिन्ह आणि गौरवपत्र असे आहे. ही संस्था जनकल्याण सामाजिक सेवा संस्था ही पर्यावरण संवर्धन, कृषी विकास, महिला सबलीकरण, व्यसनमुक्ती, कामगार कल्याण, तसेच बालके, कुष्ठरोगी आणि अपंग व्यक्तींसाठी सातत्याने कार्यरत असलेली प्रतिष्ठित संस्था आहे.
Rain Update : “पश्चिम महाराष्ट्रात यलो अलर्ट; विजांसह पावसाची शक्यता”
Paranjape Vidya Mandir : परांजपे विद्यामंदिरात अत्याधुनिक संगणक दालनाचे उद्घाटन
ह.भ.प. शेटे महाराज हे गेली अनेक वर्षे मावळ तालुक्यात भजन, कीर्तन, समाजजागृती आणि धार्मिक जनकल्याण कार्य करत आहेत. त्यांना यापूर्वीही मावळ भूषण, भजन सम्राट, कला रत्न, कला भूषण, विश्व महासन्मान, समाज भूषण, मावळ वार्ता पुढारी पुरस्कार, कंठ भूषण, मावळ रत्न, गोवाराज्य पुरस्कार, महाराष्ट्र भजन गौरव, कला गौरव, गायन कोकिळा असे अनेक मानाचे सन्मान मिळालेले आहेत.
याचबरोबर, मावळ तालुक्यात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यासाठी यंदा सुरु झालेल्या “कर्मसिद्धी पुरस्कार” ने शेटे महाराज यांच्या पत्नी आशा शेटे यांनाही नुकताच गौरविण्यात आले आहे. त्यामुळे शेटे दांपत्य हे मावळचे प्रेरणादायी समाजकार्याचे प्रतीक ठरले आहे.