situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Maval:मावळ तालुक्यातील आजीवली शाळेचा पर्यावरण संवर्धनाबद्दल सन्मान

Published On:

मावळ ऑनलाईन -पर्यावरण संवर्धन आणि वाचविण्यासाठी नाविन्यपूर्ण (Maval)उपक्रम राबविणाऱ्या मावळ तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा आजीवली यांचा Environment Conservation Association (ECA) तर्फे गौरव करण्यात आला.

या सोहळ्यात पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त सौ. तृप्ती सांडभोर, पर्यावरण विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजय कुलकर्णी तसेच सायन्स पार्कचे व्यवस्थापक प्रवीण तुपे यांच्या हस्ते शाळेला ट्रॉफी प्रदान करण्यात आली.

आजीवली शाळेने गेल्या काही वर्षांपासून विद्यार्थ्यांच्या सहभागातून वृक्षारोपण, कचरा व्यवस्थापन, प्लास्टिक निर्मूलन, पाणी बचत, सौरऊर्जेचा वापर आणि जैवविविधता संवर्धन यांसारखे अनेक उपक्रम यशस्वीपणे राबवले आहेत. या माध्यमातून गावकऱ्यांसाठी आदर्श निर्माण करत समाजात पर्यावरणपूरक सवयी रुजवण्याचे कार्य शाळेने केले आहे.

Pune: पंडित रामदास पळसुले यांना स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे शास्त्रीय संगीत पुरस्कार

Talegaon Dabhade: सर्वगुणसंपन्न विद्यार्थी तयार करण्यासाठी विशेष परिश्रम घ्यावे- रामदास काकडे

या वेळी बोलताना अतिरिक्त आयुक्त सौ. तृप्ती सांडभोर म्हणाल्या, “शाळकरी मुलांच्या माध्यमातून समाजात पर्यावरणाबाबत जागृती पसरविण्याचे कार्य आजीवली शाळेने केले असून ही शाळा इतरांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.”

श्री. संजय कुलकर्णी यांनी शाळेच्या उपक्रमांचे कौतुक करून अशा उपक्रमांचा व्याप आणखी वाढविण्याचे आवाहन केले. तर श्री. प्रवीण तुपे यांनी सायन्स पार्कमार्फत शाळेला आवश्यक तांत्रिक आणि शैक्षणिक सहकार्य देण्याचे आश्वासन दिले.

सत्कार सोहळ्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. कमल खोत यांनी भावना व्यक्त करताना सांगितले की, “हा सन्मान केवळ वैयक्तिक नसून आजीवली शाळेतील सर्व विद्यार्थी, पालक आणि गावकऱ्यांच्या सहकार्याचा आहे. या यशामागे सर्वांचे सामूहिक प्रयत्न आहेत.”

शाळेच्या या सन्मानामुळे विद्यार्थी व शिक्षक वर्गात प्रचंड उत्साहाचे वातावरण असून या यशामुळे संपूर्ण गावाचा अभिमान वाढल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.

Follow Us On