हॉटेल, सोसायट्या व वैयक्तिक ग्राहकांसाठी खास सेवा; चुलीवर भाजलेल्या पोळ्या व भाकऱ्यांची होम डिलिव्हरी
मावळ ऑनलाईन – मावळ तालुक्यातील सोमाटणे फाटा परिसरात ‘खट्टे एंटरप्रायजेस’ने अन्न प्रक्रिया क्षेत्रात अभिनव पाऊल उचलले असून, आता येथे अगदी एका तासात १२०० पर्यंत भाकऱ्या आणि चपात्या तयार होणार आहेत. नवीन अत्याधुनिक ऑटोमॅटिक मशीनच्या साहाय्याने हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे.
गणपती माळ, सोमाटणे-तळेगाव शॉर्टकट रोडवरील आकार फॉण्ड्री कंपनीजवळ हे उत्पादन केंद्र सुरु करण्यात आले असून, येथे गहू, तांदूळ, ज्वारीसह सर्व प्रकारचे दळणही दळून मिळते. खास गोष्ट म्हणजे येथे ज्वारी, बाजरी, तांदळाच्या भाकऱ्या व गव्हाच्या चपात्या ऑर्डरप्रमाणे तयार करून दिल्या जातात. चुलीवर भाजलेल्या मऊ, नरम किंवा कडक भाकऱ्यांची ऑर्डरही येथे स्वीकारली जाते.
Vadgaon Maval : भाजपा आंदर मावळ , वडगाव , कामशेत मंडलच्यावतीने संकल्प सभा संपन्न
हॉटेल व्यवसायिक, सोसायटी सदस्य, मेस चालवणारे, कॅंटीन, तसेच वैयक्तिक ग्राहकांसाठी ही सेवा अतिशय उपयुक्त ठरणार आहे. “ऑर्डर दिल्यानंतर तीन तासांत डिलिव्हरी” देण्याची खात्री ‘खट्टे एंटरप्रायजेस’ने दिली आहे. सद्यःस्थितीत ग्राहकांच्या मागणीनुसार उत्पादन करण्यात येत असून, ऑर्डर वाढत आहेत.
आरोग्यासाठी उपयुक्त भाकरी
ज्वारीच्या भाकरीचे आरोग्यदायी फायदे लक्षात घेता सध्या डॉक्टरही रुग्णांना मैद्यापासून दूर राहून ज्वारीच्या भाकरीचा आहारात समावेश करण्याचा सल्ला देतात. साखर वाढणाऱ्या रुग्णांसाठी ही भाकरी फायदेशीर ठरते. त्यामुळे चव, पोषणमूल्य आणि सुविधा यांचा संगम साधणारा हा उपक्रम अनेकांसाठी आशादायक ठरणार आहे.
माफक दरात दर्जेदार सेवा
ज्वारीची नरम भाकरी – 15 रुपये
बाजरीची नरम भाकर – 15 रुपये
तांदळाची नरम भाकरी-15 रुपये
गव्हाची चपाती – 15 रुपये
ज्वारीची कडक भाकरी – 10 रुपये
बाजरीची कडक भाकरी – 10 रुपये
याशिवाय सर्व प्रकारच्या पोळ्या व भाकरी पारंपरिक मातीच्या चुलीवर भाजून दिल्या जातात. ‘ओन द स्पॉट’ ऑर्डरप्रमाणे उत्पादन करून देण्याची सुविधा असून, माफक शुल्कात होम डिलिव्हरी सर्व्हिस देखील सुरू करण्यात आली आहे.
संपर्क:
- खट्टे एंटरप्रायजेस / खट्टे इंटरप्राईज
- 📞 8073388984 / 9149785839
- पत्ता : गणपती माळ, सोमाटणे फाटा, ता. मावळ, जि. पुणे
- आकार फॉण्ड्री कंपनीजवळ, तळेगाव शॉर्टकट रोड
👉 तुम्ही व्यवसायिक असाल किंवा घरगुती ग्राहक – आता ताज्या, चविष्ट व आरोग्यदायी भाकऱ्यांची ऑर्डर देण्यासाठी मावळमध्ये एक विश्वासार्ह पर्याय तयार झाला आहे…✍️