मावळ ऑनलाईन –मावळ तालुक्यातील बेलज गावाजवळील (Maval)आंद्रा धरणाच्या बॅकवॉटरमध्ये बुडून दीक्षा प्रवीण ओव्हाळ (वय १५, रा. बेलज, ता. मावळ, जि. पुणे) या विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, शुक्रवारी (२६ जुलै) दुपारच्या सुमारास दीक्षा ही आंद्रा धरणाच्या बॅकवॉटरजवळ इतर मुलांबरोबर गेली होती. खेळता खेळता तिचा तोल गेला आणि ती खोल पाण्यात पडली. काही क्षणांतच ती पाण्यात बुडाली. याची माहिती मिळताच गावात खळबळ उडाली. स्थानिकांनी तत्काळ मदतीसाठी आपत्ती व्यवस्थापनाशी संपर्क साधला.
Indrayani River : इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीत वाढ; भक्ती सोपान पुलावरून पाणी
Ajit Pawar: हिंजवडीच्या विकासकामात अडथळे आणणाऱ्या विरोधात गुन्हे दाखल करा- अजित पवार यांचा स्पष्ट इशारा
घटनेनंतर मदतीसाठी वन्यजीव रक्षक मावळ संस्था, शिवदुर्ग रेस्क्यू लोणावळा व आपदा मित्र मावळ या तिन्ही संस्थांचे स्वयंसेवक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाण्यात शोधमोहीम सुरू केली.
पाण्यात उतरून शोध घेतल्यानंतर काही वेळातच दीक्षाचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. या मोहिमेत निलेश गराडे, अनिल आंद्रे, शुभम काकडे, अनिश गराडे, विनय सावंत, गणेश गायकवाड, कुंदन भोसले आणि आकाश ओव्हाळ या युवकांनी विशेष प्रयत्न केले.
गावात हळहळ
दीक्षा ही बेलज येथील रहिवासी असून, तिचे वय अवघे १५ वर्षे होते. ती इतर मुलांबरोबर बाहेर गेली होती. ही घटना घडल्यावर संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. संपूर्ण गावावर शोककळात पसरली होती.