मावळ ऑनलाईन –मावळ तालुका वारकरी सांप्रदाय मंडळाच्या (Mangrul)वतीने श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर,मंगरूळ येथे रविवार (दि१४) आध्यात्मिक व सामाजिक उपक्रमाचे अत्यंत उत्साहात आयोजन करण्यात आले.
यावेळी मोठ्या संख्येने वारकरी व ग्रामस्थ उपस्थित होते. वारकऱ्यांमध्ये देव, देश, धर्म आणि वारकरी सांप्रदायाप्रती प्रेम व आवड वाढीस लागावी या उद्देशाने प्रत्येक महिन्याला हा उपक्रम आयोजित केला जात असल्याचे मंडळाचे संस्थापक/अध्यक्ष हभप नंदकुमार महाराज भसे यांनी सांगितले.
श्री पांडुरंगाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. यावेळी मंडळाचे सामुदायिक भजन संपन्न झाले.
Pune : व्यवसायवाढीसाठी ‘ब्राह्मण बिझनेस काँक्लेव्ह कमिटी’तर्फे उपक्रम; व्यवसायाची वाटचाल : छोट्या पावलांपासून मोठ्या यशाकडे
Pimpaloli Crime News : पिंपळोली येथे रिक्षा चालकाला किरकोळ कारणावरून मारहाण
त्यानंतर १००% डायबिटीज मुक्तीसाठी आयुर्वेदाचे तज्ञ डॉ. सोपान कृष्णा मिसाळ सर ( चिंचवड) यांचे विशेष मार्गदर्शन वारकऱ्यांना लाभले.तद्नंतर रूडसेट संस्थेचे संचालक राजकुमार बिरादार यांचे उद्योग व्यवसाय या विषयावर मार्गदर्शन लाभले. यानंतर विविध विषयांवर चर्चा झाली. शेवटी पसायदानाने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

तसेच श्री भंडारा डोंगर ट्रस्टच्या वतीने भंडारा डोगरावर होत असलेले श्री संत तुकाराम महाराजांचे मंदिर बांधकामासाठी मंगरूळ येथील ग्रामस्थांनी सुमारे ६ लाख ८७ हजार रूपयांची देणगी मावळ तालुका वारकरी सांप्रदाय मंडळाच्या माध्यमातून श्री भंडारा डोंगर ट्रस्टला दिली आहे. श्री भंडारा डोंगर ट्रस्टने मावळ तालुका वारकरी सांप्रदाय मंडळाला मावळ तालुक्यातील प्रत्येक गावातून व प्रत्येक घरातून मंदिरासाठी निधी उभारणी करण्यासाठी परवानगी दिलेली आहे. या निधी संकलनाची सुरुवात मंगरूळ येथून करण्यात आली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडळाचे सचिव ह.भ.प. रामदास पडवळ यांनी केले. तसेच विभाग प्रमुख बंडू कदम, विभागीय अध्यक्ष दिपक वारिंगे,भाऊसाहेब थरकुडे, सुर्यकांत भांगरे, नानासाहेब घोजगे, गोविंद सावले,धर्मनाथ चव्हाण, बाळासाहेब मराठे, नानासाहेब लोंढे,सागर वहिले,सोपान भसे,शंकर शेटे, रोहिदास जगदाळे यांचे या उपक्रमासाठी विशेष सहकार्य लाभले.