मावळ ऑनलाईन – गणेशोत्सवातील सामाजिक जाणीव, कलात्मकता, पर्यावरणपूरक उपक्रम आणि शिस्तबद्ध मिरवणूक ( Mangalurti Award Competition) यांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी घेतली जाणारी ‘मंगलमूर्ती अवॉर्ड २०२५’ स्पर्धा यावर्षीही सर सेनापती उमाबाई दाभाडे सेवा प्रतिष्ठानतर्फे आयोजित करण्यात आली आहे.
या स्पर्धेत स्थिरमूर्ती देखावा, हलत्या मूर्तीचा देखावा आणि जिवंत देखावा ( Mangalurti Award Competition) असे तीन प्रकार ठेवण्यात आले असून, प्रत्येक प्रकारातील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना पारितोषिके दिली जाणार आहेत. याशिवाय, दोन उत्तेजनार्थ बक्षिसांचाही समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे मंडळांना सृजनशीलतेबरोबरच सांस्कृतिक व सामाजिक संदेश देण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

गणेशोत्सवाच्या मिरवणुकीत शिस्तबद्धता, पारंपरिक वाद्यांचा वापर आणि पर्यावरणपूरक पद्धती अंगीकारणाऱ्या आदर्श मंडळाला ‘लोकमान्य टिळक पुरस्कार’ प्रदान केला जाणार ( Mangalurti Award Competition) आहे. या पुरस्कारासाठी पारंपरिक खेळ, उत्कृष्ट ढोल-ताशा वादन आणि शिस्तबद्ध मिरवणूक या बाबींचा विचार करण्यात येणार आहे.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी स्पर्धेसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आज (२९ ऑगस्ट) असून, प्रतिष्ठानतर्फे सर्व मंडळांना वेळेत नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात ( Mangalurti Award Competition) आले आहे.
या संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत प्रतिष्ठानचे संस्थापक संतोष दाभाडे पाटील व अध्यक्ष दीपक दाभाडे यांनी स्पर्धेचा उद्देश, पुरस्कार आणि अर्जाची अंतिम मुदत याबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी कार्याध्यक्ष आनंद दाभाडे, सचिव ॲड. विनय दाभाडे, खजिनदार विनोद दाभाडे आदी ( Mangalurti Award Competition) मान्यवर उपस्थित होते.