मावळ ऑनलाईन – मागील महिन्याभरापासून पवन मावळ परिसरात सुरू असलेल्या वीजपुरवठ्याच्या लपंडावामुळे नागरिकांचे जनजीवन पूर्णपणे( Mahavitran) विस्कळीत झाले आहे. वारंवार तक्रारी करूनही काहीच परिणाम न झाल्याने संतप्त नागरिकांनी अखेर महावितरणच्या अधिकाऱ्यांवर आपला रोष व्यक्त करत शाल, श्रीफळ व दोरीचा हार घालून ‘सत्कार’ केला. काले कॉलनी येथील महावितरण कार्यालयाला टाळं ठोकून अनोख्या पद्धतीने निषेध करण्यात आला.
Pavana Dam : पवना व आंद्रा धरणाच्या पाणीपातळीत मोठी वाढ,पवना 77 टक्के तर आंद्रा 92 टक्के
महिनाभराचा अंधार, हजारोंचे नुकसान
मावळ तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत विद्युत खांब व तारा कोसळल्या आहेत. यामुळे काले-पवनानगरसह सुमारे ४२ गाव वाड्या-वस्त्यांमधील वीजपुरवठा खंडित आहे. लाईट नसल्याने छोटे-मोठे व्यवसाय, दुकाने, वैद्यकीय सेवा आणि दैनंदिन व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले आहेत. यामुळे नागरिकांचे आर्थिक नुकसान दिवसेंदिवस वाढत ( Mahavitran) आहे.
Policeman’s Suicide : स्वारगेट पोलीस वसाहतीत पोलिसाची गळफास घेत आत्महत्या
कार्यालयात घेराव, कर्मचाऱ्यांचे मतभेद उघड
सोमवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास पवन मावळातील नागरिकांनी काले कॉलनीतील महावितरण कार्यालयात धडक दिली. यावेळी शाखा अभियंता अमय रामगिरी यांनी कर्मचारी परशुराम खोपडे यांना तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. मात्र खोपडे यांनी “तुम्ही काम करा, मी नाही करणार” असा उलट प्रतिसाद दिल्याने अधिकाऱ्यांमधील समन्वयाचा अभाव समोर आला. याचे परिणाम ग्रामस्थांना भोगावे लागत असल्याने संतप्त नागरिकांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.
उग्र आंदोलनाचा इशारा
“पुढील आठवडाभरातही वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांना कार्यालयातच डांबून ठेवू,” असा स्पष्ट इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. या आंदोलनामुळे प्रशासनाच्या कार्यप्रणालीबद्दल जनतेमध्ये वाढत असलेला असंतोष प्रकर्षाने समोर आला ( Mahavitran) आहे.
“मी नुकताच या कार्यालयात रुजू झालो असून, नागरिकांच्या सर्व तक्रारींचे निवारण येत्या आठवडाभरात करण्यात येईल.”
अमय रामगिरी, शाखा अभियंता, महावितरण काले कॉलनी
“गेल्या महिन्याभरापासून आमच्या भागात वीजपुरवठा खंडित आहे. काले-पवनानगरसह ४२ गावांमधील व्यापारी व नागरिक आर्थिक संकटात आहेत. महावितरणने तातडीने योग्य पावले उचलावीत.”
अतुल लक्ष्मण कालेकर,स्थानिक रहिवासी.