मावळ ऑनलाईन – राज्यातील २७४ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ( Maharashtra Elections) सार्वत्रिक निवडणुकांची प्रक्रिया वेग घेऊ लागली आहे. यामध्ये २४७ नगरपरिषदा व ४२ नगरपंचायतींच्या सदस्यपद आणि थेट अध्यक्षपदाच्या निवडणुका होणार असून त्यासाठीची प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी ८ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
SSC Exam: दहावीच्या फेब्रुवारी-मार्च 2026 बोर्ड परीक्षेसाठी अर्ज भरण्याच्या तारखांना मुदतवाढ
राज्य निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, या प्रारूप याद्यांवर १३ ऑक्टोबर २०२५ पर्यंत नागरिकांना हरकती व सूचना नोंदविण्याची मुदत देण्यात आली आहे. प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांचा विचार करून २८ ऑक्टोबर २०२५ रोजी अंतिम मतदार यादी जाहीर केली ( Maharashtra Elections) जाणार आहे.
निवडणूक आयोगाने सांगितले की, १ जुलै २०२५ हा अधिसूचित दिनांक निश्चित करण्यात आला आहे. त्या दिवशी अस्तित्वात असलेली विधानसभेची मतदार यादीच या निवडणुकांसाठी वापरण्यात येणार आहे. त्यामुळे नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांच्या प्रभागनिहाय मतदार याद्यांमध्ये विधानसभा मतदार यादीतील नावे व पत्ते कायम ठेवले जाणार( Maharashtra Elections) आहेत.
SSC Exam: दहावीच्या फेब्रुवारी-मार्च 2026 बोर्ड परीक्षेसाठी अर्ज भरण्याच्या तारखांना मुदतवाढ
तथापि, या याद्यांमध्ये नवीन नावे समाविष्ट करणे, नावे वगळणे अथवा पत्ता दुरुस्ती करण्याचा अधिकार राज्य निवडणूक आयोगाकडे नाही. प्रभागनिहाय यादी तयार करताना लेखनिकांकडून होणाऱ्या चुका, चुकून मतदाराचा प्रभाग बदलणे, विधानसभा यादीत नाव असूनही प्रभागनिहाय यादीत नाव नसणे अशा त्रुटींवर मतदार हरकती व सूचना नोंदवू ( Maharashtra Elections) शकतात.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदारांची अचूक नोंदणी होण्यासाठी नागरिकांनी प्रारूप मतदार यादी तपासून आवश्यक त्या दुरुस्त्या वेळेत दाखल करण्याचे आवाहन राज्य निवडणूक आयोगाने केले ( Maharashtra Elections) आहे.