मावळ ऑनलाईन – रविवारी – 7 सप्टेंबर 2025 या ( Lunar Eclipse ) दिवशी खग्रास चंद्रग्रहण आहे. हे ग्रहण भारतात सर्वत्र दिसणार आहे. त्याच बरोबर संपूर्ण आशिया खंडात ,आफ्रिका खंड, संपूर्ण युरोप ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, नाॅर्वे,अंटाक्टिॅका या प्रदेशात ग्रहण दिसेल आपण सर्वांनी या ग्रहणाचे विधी व नियम पाळणे आवश्यक आहे.
Sachin Khinwasara : वाहने घेऊन फसवणूक करणाऱ्या सचिन खिंवसराला अटक
ग्रहणाचा पुण्यकाल – ग्रहण स्पर्शापासून ते मोक्षा पर्यंतचा ( Lunar Eclipse) काळ हा पुण्यकाळ आहे. म्हणजेच रात्री 9:57 ते पहाटे 01:27 वाजेपर्यंतचा काळ हा पुण्य काळ आहे. या काळात स्नान, देवपूजा, नित्य जप, पोथीवाचन, पारायण इत्यादी कर्मे करू शकता.
Srujan Nrutyalay : मंदिरे हा भारतीय संस्कृतीचा अमूल्य ठेवा _ आशुतोष बापट
ग्रहणाचा वेध आरंभ –
हे ग्रहण रात्रीच्या दुसऱ्या प्रहरात सुरू होत असल्यामुळे ( Lunar Eclipse) तीन प्रहर आधी म्हणजे, दुपारी 12: 37 पासून ते ग्रहण मोक्षा पर्यंत वेध पाळावेत. वेधकाळात भोजन निषेध आहे. म्हणून या काळात अन्नपदार्थ खाऊ नये. लहान मुले, वृद्ध, आजारी, अशक्त व्यक्ती आणि गर्भवती स्त्रीने सायंकाळी 5:15 पासून ग्रहणाचे वेध पाळावेत. रात्री 9:57 ते 1:27 या काळात पाणी पिणे, झोपणे, मलमूत्रविसर्जन ही कर्मे करू नयेत.
महत्त्वाचे – ग्रहण स्पर्श होताच स्नान करावे.या काळात देवपूजा, होम- हवन, दानधर्म करावा. गुरुकडून घेतलेल्या मंत्राचा जप करणे आवश्यक आहे. ग्रहण मोक्षानंतर स्नान करणे आवश्यक आहे.
ग्रहणाचे राशी परत्वे फल
1) मेष, वृषभ, कन्या,धनु या राशींना ग्रहणाचे शुभफल मिळेल.
2) मिथुन, सिंह, तूळ, मकर या राशींना मिश्र फळ मिळेल. ( Lunar Eclipse)
3) कर्क, वृश्चिक, कुंभ, मीन या राशींना अनिष्ट फळ मिळेल.
ज्या राशींना अनिष्ट फळ मिळणार आहे, त्या राशींच्या व्यक्तींनी आणि गर्भवतीने हे ग्रहण पाहू नये.
गर्भवती स्त्रियांसाठी महत्त्वाचे नियम –
1) ग्रहण काळात कापणे, चिरणे, पिळणे, शिवणे पूर्ण बंद ठेवावे.
2) पायाची अढी घालून बसू नये.
3) पाणी पिताना त्यात तुळशीपत्र घालून प्यावे
4) ग्रहण काळात झोप घेऊ नये.
5) शक्यतो देवघरात बसून नामस्मरण, मंत्र जाप, पोथी वाचन करावे.
ग्रहणाचा मोक्ष झाल्यानंतर म्हणजेच रात्री 1:27 नंतर मोक्ष स्नान करावे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी शुद्ध सूर्य बिंब पाहून नंतरच भोजन ( Lunar Eclipse) करावे.
संदर्भ दाते पंचांग,ज्योतिर्भास्कर उमेश स्वामी,ज्योतिष व वास्तुसल्लागार.