मावळ ऑनलाईन – लोणावळा नगरपरिषदेने आज (दि.21) सकाळी ( Lonvala Rain) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, शहरात यंदाच्या पावसाळ्यात पावसाची सरासरी मागील वर्षाच्या तुलनेत लक्षणीयरीत्या जास्त झाली आहे. गेल्या 24 तासांत लोणावळ्यात तब्बल 136 मिमी (5.35 इंच) पाऊस नोंदविण्यात आला आहे.
पावसाचा तुलनात्मक आढावा:
चालू वर्षातील (2025) एकूण पाऊस – 4946 मिमी (194.72 इंच)
मागील वर्षी (2024) याच कालावधीत – 4527 मिमी (178.23 इंच)
तर संपूर्ण 2024 वर्षाचा पाऊस – 6013 मिमी (236.73 इंच)
Lonavala News : लोणावळा राष्ट्रीय महामार्गावर महिलांचा राडा; वाहतूक तासभर ठप्प
यावरून स्पष्ट होते की, यंदा 21 ऑगस्टपर्यंत लोणावळ्यात मागील ( Lonvala Rain) वर्षाच्या तुलनेत 419 मिमी (16.49 इंच) जास्त पाऊस झाला आहे. मागील वर्षी याच दिवशी फक्त 13 मिमी (0.51 इंच) पावसाची नोंद झाली होती, तर यंदा एका दिवसातच 136 मिमी पाऊस झाल्याने पावसाची तीव्रता किती जास्त आहे हे लक्षात येते.
मुसळधार पावसामुळे परिसरातील धरणांमध्ये जलसाठा वेगाने वाढत असून नद्या, ओढे आणि धबधबे धोकादायक पातळीवरून वाहू लागले आहेत. पर्यटकांची मोठी गर्दी लोणावळा व आसपासच्या भागात होत असल्याने प्रशासनाने सतर्क राहण्याचे आवाहन केले ( Lonvala Rain) आहे.