मावळ ऑनलाईन – लोणावळा शहरातील बाजारपेठेत ( Lonvala News ) वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरत असलेल्या वाहनधारकांवर वाहतूक पोलिसांनी मोठी दंडात्मक कारवाई केली आहे. मनमानी पद्धतीने रस्त्यावर वाहने उभी करून नागरिकांना तसेच वाहनचालकांना अडथळा निर्माण करणाऱ्या 120 वाहनधारकांकडून तब्बल 95 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
Hinjawadi Crime News : हिंजवडीमध्ये नवऱ्याच्या प्रेयसीचे भर दिवसा अपहरण
बाजारपेठ परिसरात मागील काही महिन्यांपूर्वी वाहतूक ( Lonvala News ) शिस्त राखण्यासाठी पोलिसांनी बॅरिकेटिंगची व्यवस्था केली होती. मात्र, त्याला व्यापारी आघाडी आणि काही स्थानिक राजकीय पदाधिकाऱ्यांचा विरोध झाल्याने ते बॅरिकेटिंग काढण्यात आले. त्यानंतर पुन्हा नागरिकांकडून वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष होऊ लागले. मनाला येईल त्या पद्धतीने रस्त्यावर वाहने उभी केली जात असल्याने बाजारभागात नियमितपणे वाहतूक कोंडीचा त्रास निर्माण होत होता.
Rashi Bhavishya 22 August 2025 : कसा जाईल आपला आजचा दिवस?
या वाढत्या समस्येकडे लक्ष देत, पोलीस निरीक्षक राजेश रामाघारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश भिसे, पोलीस हवालदार अनिल शिंदे व त्यांच्या टीमने शुक्रवारी सकाळपासून विशेष मोहीम राबवली. या मोहिमेत 120 वाहनांवर कारवाई करत ( Lonvala News ) त्यांना दंड ठोठावण्यात आला.
वाहनधारकांनी शिस्तीचे पालन करावे, आपल्या वाहनांमुळे इतरांना अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे. “वारंवार सूचना करूनही नागरिक नियमांकडे दुर्लक्ष करतात, त्यामुळे दंडात्मक कारवाई करणे भाग पडते,” असेही यावेळी पोलिसांनी स्पष्ट केले.
या कारवाईनंतर बाजारपेठ परिसरात काही काळासाठी वाहतूक सुरळीत झाली असून, नागरिक व व्यापाऱ्यांमध्ये याविषयी चर्चेला उधाण आले ( Lonvala News ) आहे.