मावळ ऑनलाईन – लोणावळा शहरात 19 ऑगस्ट रोजी ( Lonvala Crime News) दिवसभर मुसळधार ते अति मुसळधार पावसाने अक्षरशः थैमान घातले. या पावसाचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी भांगरवाडी परिसरातील दोन वेगवेगळ्या फ्लॅटमध्ये घरफोडी करत तब्बल 5 लाख 87 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना 19 ऑगस्ट रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास ते 20 ऑगस्ट रोजी सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत घडल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे.
याप्रकरणी भांगरवाडी येथील सुजल पार्क सोसायटीत राहणारे योगेश कोठावदे यांनी लोणावळा शहर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. फिर्यादी कोठावदे हे 19 ऑगस्ट रोजी आपल्या कुटुंबासह कल्याण येथे गेले होते. घर बंद असल्याची संधी साधत चोरट्यांनी त्यांच्या फ्लॅटच्या दरवाज्याची कडी तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर बेडरूममधील लोखंडी कपाटाचे ( Lonvala Crime News) लॉक फोडून त्यामध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा 5 लाख 77 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला.
दरम्यान, त्याच कालावधीत भांगरवाडी येथील गोखले पार्कमधील भरत मेंगडे यांच्या घरातही चोरट्यांनी धाड टाकली. त्यांच्या घरातून रोख रक्कम व चांदीच्या पट्ट्या असा 10 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याची नोंद करण्यात आली आहे.
मुसळधार पावसामुळे रस्त्यावर वर्दळ कमी असताना चोरट्यांनी घरफोडीचा डाव साधल्याचे स्पष्ट होत आहे. या प्रकरणी लोणावळा शहर पोलीस ( Lonvala Crime News) ठाण्यात चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.