मावळ ऑनलाईन — वरसोली येथे किराणा दुकानासमोर ( Lonvala Crime News) केवळ दहा रुपयांच्या किरकोळ वादातून झालेल्या मारहाणीची घटना घडली आहे. या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.
Murder : जमिनीच्या वादातून तरुणाचा गळा चिरुन खून;आरोपींना नानोली भागातून घेतले ताब्यात
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सत्राराम बेलाराम देवासी (वय ३३, व्यवसाय – किराणा दुकानदार, रा. वरसोली, ता. मावळ, मूळ रा. राजस्थान) हे वरसोली येथे ‘कृष्णा ट्रेडर्स’ नावाचे किराणा दुकान चालवतात. दि. २१ ऑक्टोबर २०२५ रोजी संध्याकाळी सुमारास आरोपी शंकर लेंडवे (रा. वरसोली, ता. मावळ) हा त्यांच्या दुकानात आला होता. त्याने रूम फ्रेशनर घेतले होते, मात्र त्याचे १० रुपये उरलेले राहिले होते.
MHADA : पुण्यातील म्हाडा गृहनिर्माण सोडतीला मुदतवाढ; अर्ज प्रक्रिया २१ नोव्हेंबरपर्यंत सुरू
यानंतर दुसऱ्या दिवशी फिर्यादी देवासी यांनी त्याच्याकडे ( Lonvala Crime News) ती रक्कम मागितली असता, किरकोळ वाद वाढत गेला. संतापलेल्या शंकर लेंडवेने हातातील पांढऱ्या रंगाच्या केबल वायरने देवासी यांना मारहाण केली. तसेच मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या सार्थक पाटेकर (रा. वरसोली) यांनाही मारहाण करून दुखापत केली. दरम्यान, वाद थांबविण्यासाठी आलेल्या पूजा बाळेकर (रा. वरखेली) यांना आरोपीने शिवीगाळ व दमदाटी केली.
या घटनेनंतर फिर्यादी यांनी लोणावळा ग्रामीण पोलिस ( Lonvala Crime News) ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला असून पुढील तपास सुरू आहे.




















