मावळ ऑनलाईन – पनवेल ते कामशेत असा बस प्रवास (Lonavala)करत असताना एका महिलेच्या पर्समधील सहा लाख 34 हजार रुपयांचे दागिन्या चोरीला गेले आहेत हे घटना मंगळवारी सकाळी दहा ते दुपारी बारा या कालावधीत घडली आहे.
याप्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात हिराबाई धनाजी पाटील (वय 45 रा. चिंचवड) यांनी फिर्यादी दिली आहे. फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोराविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
Pune: BACARDIएक्सपिरियन्सेस प्रस्तुत CASA BACARDIऑन टूर, पुणे – सोबत आदित्य रिखारी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला या पनवेल ते कामशेत असा बस प्रवास करत होत्या. यावेळी चोराने फिर्यादी यांच्या नकळत हात चल की नाही पर्समधील सहा लाख 34 हजार रुपयांचे दागिने चोरले यामध्ये बोरमाळ कानातले सोन्याची साखळी , 10 तोळ्याची चांदीची चैन व रोख 6 हजार रुपये असा एकूण 6 लाख 34 हजार रुपयांचे दागिने चोरीला गेले आहेत. याचा पुढील तपास लोणावळा शहर पोलीस करत आहेत.