मावळ ऑनलाईन – पावसाळा सुरू होताच लोणावळा आणि आजूबाजूच्या पर्यटनस्थळांवर पर्यटकांचा ओघ वाढू लागला आहे. विशेषतः एकविरा देवी मंदिर, भाजे लेणी, लोहगड, विसापूर किल्ला, टायगर पॉईंट, पवना धरण या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी, अपघात आणि अडथळे टाळण्यासाठी पुणे ग्रामीण पोलीस आणि जिल्हा प्रशासन यांनी काही प्रमुख मार्गांमध्ये महत्त्वाचे वाहतूक बदल केले आहेत. हे बदल ७ जून २०२५ ते ३१ ऑगस्ट २०२५ या कालावधीत अंमलात असतील.
जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी मोटार वाहन अधिनियम १९८८ अंतर्गत मिळालेल्या अधिकारांचा वापर करून ही अधिसूचना ६ जून रोजी जाहीर केली. या आदेशानुसार खालीलप्रमाणे मार्गबदल करण्यात आले आहेत.
Lonavala : लोणावळ्यात पावसाळी गर्दीवर प्रशासनाची कात्री ; ७ जून ते ३१ ऑगस्टपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू
🔸 वाहतूकबदल व पर्यायी मार्ग
- भाजे गावाकडून मळवली-कार्ला मार्ग बंद
- 🚗 पर्यायी मार्ग : पाटण ब्रिज → देवले औंढे ब्रिज → कुसगाव → लोणावळा → जुना हायवे / एक्सप्रेसवे
- औंढे-देवले मार्गे मळवली-भाजे येणारी वाहतूक बंद
- 🚗 पर्यायी मार्ग : औंढे → लोणावळा → कार्ला फाटा → मळवली → भाजे
मळवली/सदापुरहून कार्ला दिशेने वाहतूक बंद
- 🚗 पर्यायी मार्ग : मळवली → सदापुर → वाकसई फाटा → जुना हायवेवाकसई फाटा ते मळवली मार्ग बंद
- 🚗 पर्यायी मार्ग : कार्ला फाटा → मळवली → पाटण → भाजे
भाजे ते लोहगड मार्ग ‘वन वे’
- ✅ फक्त भाजे येथून लोहगडाकडे जाणारी वाहने परवान्याने जाऊ शकतात
- ❌ परतीच्या दिशेने वाहनांना मनाई
- लोहगडहून परतीसाठी नवे मार्ग
- 🚘 चारचाकी : लोहगड → दुधिवरे खिंड → औंढोली → औंढे → कुसगाव → लोणावळा
- 🛵 दुचाकी/तीनचाकी : वरील मार्ग किंवा पवनानगरमार्गे जुना हायवे
कार्ला फाटा ते वेहेरगाव मार्गावर अवजड वाहनांना प्रवेशबंदी महत्त्वाची सूचना
वरील सर्व निर्बंध स्थानिक रहिवाशांसाठी लागू राहणार नाहीत.
पोलीस व प्रशासनाकडून पर्यटकांना *निर्देशित पर्यायी मार्गांचा वापर करून सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
वाहतूक सुरळीत, सुरक्षित आणि नियोजनबद्ध राहावी यासाठी प्रशासन सज्ज आहे, असे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी स्पष्ट केले असून, स्थानिक नागरिक, पर्यटक आणि वाहनचालकांनी नवीन मार्गदर्शक तत्वांचे पालन करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.