मावळ ऑनलाईन – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व राष्ट्रपुरुषांच्या ( Lonavala Protest) समूह शिल्प परिसरात झालेल्या तोडफोडीच्या घटनेविरोधात लोणावळा शहरात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी (दि. 15) सर्वपक्षीय दणका मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्चात नागरिक, सामाजिक संघटना, तसेच सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.
Pune: ‘पुरुषोत्तम’चा शुक्रवारी पारितोषिक वितरण समारंभ;नाना पाटेकर यांची प्रमुख उपस्थिती
ही घटना 14 ऑगस्ट रोजी सायंकाळी घडली होती. एका माथेफिरू ( Lonavala Protest) व्यक्तीने हातोड्याने शिल्प परिसरात तोडफोड करून सामाजिक सलोख्याला धक्का पोहोचवण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी नागरिकांच्या तक्रारीनंतर लोणावळा शहर पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीला अटक केली. लोणावळा नगरपरिषद प्रशासनाने देखील यानंतर शिल्प परिसरात सुरक्षारक्षक नियुक्त करून अतिरिक्त सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत.
BJP Vision-2030 : भाजपाचे ‘व्हिजन २०३०’ जनसंपर्क अभियान, पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी शुभारंभ
मोर्चादरम्यान महाराष्ट्र प्रदेश RPI चे सरचिटणीस सूर्यकांत वाघमारे म्हणाले, “ही घटना केवळ विकृत मानसिकतेचा परिणाम नसून यामागे काही षडयंत्र आहे का याचा( Lonavala Protest) पोलिसांनी सखोल तपास करावा. राष्ट्रपुरुषांच्या बाबतीत वारंवार विटंबना करणाऱ्या घटनांचा पुनरावृत्ती होत आहे. म्हणूनच असे प्रकार रोखण्यासाठी दोषींवर कठोरात कठोर कारवाई करावी. तसेच राष्ट्रपुरुषांचे पुतळे व स्मारक ज्या भागात आहेत, तेथे 24 तास सुरक्षारक्षक व सीसीटीव्ही कॅमेरे तैनात करण्यात यावेत.”
मोर्चात यापूर्वी झालेल्या प्रभाग रचनेतील त्रुटींवर देखील संताप व्यक्त( Lonavala Protest) करण्यात आला. विशेषतः सिद्धार्थ नगरसारख्या दलित वस्त्यांचे नाव प्रभागातून कमी करण्यात आले असल्याचा आरोप करण्यात आला. तसेच रेल्वे विभाग व वलवन विभाग या ठिकाणी देखील चुकीची रचना करण्यात आल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले.
या मोर्चातून शिल्प तोडफोड प्रकरणाचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला असून, पुढील काळात अशा घटना रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी प्रशासनाकडे ( Lonavala Protest) करण्यात आली.