मावळ ऑनलाईन –लोणावळा शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याच्या तपासात मदत (Lonavala)करण्यासाठी २५ हजारांची मागणी करून २० हजार रुपये स्वीकारताना सहायक पोलीस उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली. शकील मोहम्मद शेख (४५) असे अटक केलेल्या सहायक पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे.
लोणावळा शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याच्या तपासात मदत करण्यासाठी शेख यांनी ४२ वर्षीय व्यक्तीकडे २५ हजार रुपयांची मागणी केली. याबाबत व्यक्तीने एसीबीकडे तक्रार केली.
Yugendra Pawar: तुतारी घराघरात पोहोचवा – युगेंद्र पवार
Pune: पुण्यात सायंकाळी पावसाचा इशारा; हवामान खात्याचा यलो अलर्ट
एसीबीने २३ ते २५ सप्टेंबर दरम्यान नारायणीधाम पोलीस चौकीत सापळा लावला. यामध्ये शेख यांनी तक्रारदार व्यक्तीकडे पैशांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर सोमवारी (२९ सप्टेंबर) रोजी पुन्हा सापळा लावला असता शेख यांना तडजोड करून २० हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. याबाबत लोणावळा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहायक पोलीस आयुक्त भारती मोरे तपास करीत आहेत.