मावळ ऑनलाईन – पर्यावरण संवर्धनासाठी आणि (Lonavala)जलप्रदूषण रोखण्यासाठी डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा यांच्यामार्फत यंदाही लोणावळा, इंदोरी व देहूरोड येथील इंद्रायणी नदी घाटांवर तसेच लोणावळा धरण विसर्जन घाटावर गणेश विसर्जनावेळी निर्माल्य संकलन करण्यात आले. तिर्थरूप डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी आणि तिर्थरूप डॉ. सचिन दादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान पार पडले.
लोणावळा परिसरातील डोंगरगाव, तुंगार्ली, कार्ला, देवले, अंबावणे, पवनानगर येथील 116 सदस्यांनी सातव्या दिवशी व अनंत चतुर्थीच्या दिवशी सकाळी 11 ते संध्याकाळी 8 या वेळेत सक्रिय सहभाग घेतला. या मोहिमेत एकूण 465 किलो निर्माल्य संकलित करण्यात आले. संकलित निर्माल्यातील प्लास्टिक व न कुजणारे घटक वेगळे करून उर्वरित घटकांपासून खत तयार करण्यात येणार आहे. वाकसई चाळ येथे या खताची निर्मिती होऊन ते प्रतिष्ठानच्या वृक्षारोपण मोहिमेतील झाडांना उपयोगात आणले जाणार आहे. या उपक्रमामुळे इंद्रायणी नदीचे प्रदूषण टाळण्यास मोठी मदत होणार आहे.
Pune traffic update : ईद-ए-मिलाद मिरवणुकीनिमित्त पुण्यात आज वाहतुकीत बदल
Bhagwan Shinde: विद्यार्थ्यांनी जुनी व नवीन अध्ययन पद्धती आत्मसात करून अभ्यास करावा- रो.भगवान शिंदे
इंदोरी व देहूरोड घाटावरही मोठ्या प्रमाणात निर्माल्य संकलित करण्यात आले. देहूरोड येथे कामशेत, कान्हे, वडेश्वर, वडगाव, तळेगाव, इंदोरी, सोमाटणे, देहूरोड, चांदखेड, घोटवडे व हिंजवडी येथील 284 सदस्यांच्या सहभागातून तब्बल 2 हजार किलो निर्माल्य जमा करण्यात आले. तर इंदोरी घाटावर 43 सदस्यांच्या मदतीने 1025 किलो निर्माल्य संकलित करण्यात आले.
गणपती विसर्जनावेळी बाप्पांच्या गळ्यातील हार, फुले व इतर धार्मिक साहित्य स्वरूपातील हे निर्माल्य जमा करून त्यापासून खत तयार करण्यात येणार असून, पर्यावरण संरक्षणाबरोबरच शेती व वृक्षसंवर्धनालाही त्याचा उपयोग होणार आहे.