मावळ ऑनलाईन – लोणावळा नगर परिषदेची (Lonavala News) सार्वत्रिक निवडणूक 2025 मध्ये होण्याचे जवळपास निश्चित झाले असून, त्याकरिता नगर परिषदेची प्रारूप प्रभाग रचना दिनांक 18 ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात आली आहे. या आराखड्यानुसार लोणावळा शहर 13 प्रभागांमध्ये विभागले गेले आहे. यापैकी 12 प्रभागांना प्रत्येकी दोन सदस्यसंख्या तर 13 व्या प्रभागाला तीन सदस्यसंख्या असणार आहे. लोकसंख्या व भौगोलिक परिस्थितीचा विचार करून ही रचना तयार करण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
प्रारूप प्रभाग रचनेनुसार प्रत्येक प्रभागाच्या चतुर्थसीमा, समाविष्ट क्षेत्र तसेच (Lonavala News) नकाशे प्रसिद्ध करण्यात आले आहेत. हा आराखडा लोणावळा नगर परिषदेच्या प्रवेशद्वाराजवळ लावण्यात आला असून संकेतस्थळावरही नागरिकांच्या पाहणीसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
Kalapini : ‘गोविंदा रे गोपाळा’ च्या गजराने कलापिनीचे प्रांगण दुमदुमले
नागरिकांना या रचनेवर हरकती अथवा सूचना नोंदवण्यासाठी (Lonavala News) संधी देण्यात आली असून, 31 ऑगस्टपर्यंत दुपारी 3 वाजेपर्यंत नगर परिषदेच्या आवक-जावक विभागाकडे लेखी स्वरूपात त्या सादर करता येणार आहेत. विशेष म्हणजे, सुट्टीच्या कालावधीतही हरकती व सूचना स्वीकारण्यासाठी विशेष कक्ष सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी अशोक साबळे यांनी दिली.
नगर परिषदेच्या प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, 1 सप्टेंबर ते 8 सप्टेंबर या कालावधीत प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांवर सुनावणी घेण्यात येणार आहे.
Achyut Potdar : ज्येष्ठ मराठी अभिनेते अच्युत पोतदार यांचे निधन
2021 साली लोणावळा नगर परिषदेची पंचवार्षिक मुदत (Lonavala News) संपल्यानंतर आस्थागायत प्रशासकीय राजवट सुरू आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे नियोजन सुरू असून, त्याचाच भाग म्हणून लोणावळा नगर परिषदेची प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.
नागरिकांच्या सहभागातून प्रभाग रचना अधिक परिणामकारक व लोकाभिमुख होईल, असा विश्वास नगर परिषदेच्या प्रशासनाने व्यक्त केला (Lonavala News) आहे.