मावळ ऑनलाईन –मोठी धार्मिक परंपरा असलेल्या, खंडाळा येथील श्री वाघजाई देवी मंदिर ट्रस्टच्या(Lonavala ) वतीने याही वर्षी नवरात्र उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा होत आहे.
सोमवार दि २२सप्टेंबर रोजी सकाळी खंडाळा गावठाण ते श्री वाघजाई देवी मंदिरा पर्यंत देवीची भव्य मिरवणूक आयोजित करण्यात आली असून, सकाळी ११.३०ते दुपारी १२वाजे पर्यंत मंदिरात घटस्थापना होणार आहे.
मावळचे आमदार सुनील शेळके व त्यांच्या पत्नी सारिका शेळके यांच्या शुभहस्ते घटस्थापना होणार आहे. नवरात्रात भजन किर्तन ,प्रवचन, गरबा नृत्य, गुणवंत विद्याथी सन्मान, आदर्श शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते, क्रीडापटू, आरती मंडळे सन्मान आदींचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार दि.२,ऑक्टोंबर रोजी सायंकाळी ६ वाजतातादेवीची पालखी छबिना मिरवणूक, श्री वाघजाई देवी मंदिर ते श्री संतोषी माता मंदिरा पर्यंत आ योजीत करण्यात आली आहे.
Sunil Shelke: मावळातील चार ग्रामपंचायतींना नवीन कार्यालयांसाठी ८५ लाखांचा निधी; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश
यावेळी खंडाळा पोलिस स्टेशनचे सहा.पोलिस निरीक्षक राहुल लाड व सहा फौजदार सूर्यकांत वाणी उपस्थित राहणार आहेत. मावळवासियानी नवरात्रात सर्व कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन विश्वस्त मंडळाने केले आहे.