मावळ ऑनलाईन – आर्थिक परिस्थितीमुळे फि न भरू शकल्याने पालकाला शाळेने पाल्याचा दाखला नाकारला. याची माहिती मिळताच महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोणावळा शहर यांनी मनसे स्टाईल ने दणका देत मुलांचा दाखला मिळविला ( Lonavala ) आहे.
याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोणावळा शहर यांच्या वतीने दोन दिवसापूर्वी सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल करण्यात आली होती की, लोणावळ्यातील कोणतीही जी शाळा मुलांच्या फी साठी अडवणूक करत असेल आणि विद्यार्थी यांना शिक्षणापासून वंचित ठेवत असेल तर त्या शाळेला मनसेच्या रोषाला सामोरे जावे लागेल.
Pavana Dam : पवना धरण ६३ टक्के भरले; मागील वर्षीच्या तुलनेत साठ्यात तब्बल तिपटीने वाढ
ही पोस्ट वाचून लोणावळा शहर लगत असलेल्या कुसगाव बु. येथील जगन्नाथ कांबळे यांनी मनसे शहर अध्यक्ष लोणावळा, निखिल भोसले यांना संपर्क केला आणि लोणावळा शहरातील किंग्स वे या शाळेने माझ्या तीन मुलांचा शाळेचा दाखला ५३ हजार फी बाकी असल्याने देत नाही अशा स्वरूपाची सदर माहिती मनसे पदाधिकारी यांना दिली.
Chinchwad Mishap : चिंचवडमध्ये पीएमपीएमएल बसवर कोसळले झाड; 7 जण किरकोळ जखमी
त्यानंतर माहिती घेतल्यानंतर संबंधित शाळा ही परवानगी नसल्याकारणाने बंद केली गेली आहे. त्यामुळे दुसऱ्या शाळेत मुलांचे अॅडमिशन करण्यासाठी शाळेचा दाखला गरजेचा असताना संबंधित शाळेने फी न भरल्या कारणाने जगन्नाथ कांबळे तीनही मुलांचे दाखला व गुणपत्रिका त्या शाळेने अडवून ठेवले होते. सर्व पडताळणी केल्यानंतर संबंधित पालक यांची खरंच अर्थिक परिस्थिती ( Lonavala ) बिकट आहे.
पडताळणी नंतर मनसेने कांबळे यांना व मुलांना सोबत घेऊन किंग्ज वे या शाळेवरती धडक देऊन मनसे अध्यक्ष निखिल भोसले व मनसे प्रवक्ते अमित भोसले यांनी मनसेच्या पद्धतीने बोलणी करून वैभवी कांबळे १० वी, साक्षी कांबळे ६ वी, आणि आदित्य कांबळे ४ थी या तीनही मुलांचे दाखले कांबळे यांना मिळवून दिले.
याप्रसंगी मनसे पदाधिकारी संदीप बोभाटे, सुनील सोनवणे, सुभाष रेड्डी, जुबेर मुल्ला, आकाश सावंत, कैवल्य जोशी, नरेश महामुनी आदी जण उपस्थित ( Lonavala ) होते.