मावळ ऑनलाईन – सुट्टीच्या दिवशी लोणावळा परिसरात फिरण्यासाठी आलेले काही पर्यटक हुल्लडबाजी करतात. अशा पर्यटकांवर पोलिसांची करडी नजर असते. रविवारी (२९ जून) लोणावळा येथे फिरण्यासाठी आलेल्या तिघांवर लोणावळा शहर पोलिसांनी कारवाई केली आहे.
याबाबत माहिती अशी कि, रविवारी तीन तरुण कार (एमएच ४२/बीएफ ८०३०) मधून लोणावळा परिसरात फिरण्यासाठी आले होते. जुन्या पुणे-मुंबई महामार्गाने खंडाळा येथून जात असताना दोघेजण कारच्या दरवाजातून बाहेर येऊन चालत्या कारमध्ये स्टंट करत होते. याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
घटनेची माहिती पोलीस उपनिरीक्षक रमेश भिसे यांना मिळाली. भिसे यांनी व्हिडीओ मध्ये दिसणाऱ्या कारचा शोध घेत तिघांना ताब्यात घेतले. दंडात्मक कारवाई करून तिघांनाही अशा प्रकारे स्टंट न करण्याबाबत तंबी देण्यात आली आहे.