situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Lonavala:लोणावळा शहर कचरा व्यवस्थापनासाठी बायो-CNG प्रकल्पास हिरवा कंदील

Published On:
lonavala

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आमदार सुनील शेळके यांचा पुढाकार

मावळ ऑनलाईन – लोणावळा-खंडाळा या राज्यातील महत्वाच्या पर्यटन केंद्रातील(Lonavala) कचरा व्यवस्थापनाची समस्या सोडविण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. पुण्यातील VVIP गेस्ट हाऊस येथे आज झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकाराने बायो-CNG प्रकल्पाच्या आराखड्याला हिरवा कंदील मिळाला.

लोणावळा शहरात सध्या दररोज सुमारे ७० मेट्रिक टन कचरा निर्माण होतो. ओला, सुका, प्लास्टिक आणि ई-कचऱ्याचे वैज्ञानिक पद्धतीने विभाजन करून प्रक्रिया करण्यासाठी आधुनिक केंद्र उभारण्यात येणार आहे. जुन्या डंपिंग यार्डमध्ये साचलेला जवळपास १ लाख मेट्रिक टन कचऱ्याचा प्रश्न निकाली काढण्याचाही निर्णय या बैठकीत घेण्यात आला.


MLA Sunil Shelke : आमदार सुनील शेळके यांच्या जनसंवाद अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद

Pune :सहकारनगर पोलीस ठाण्यात जप्त 16 बिनधनी दुचाकी; वाहन मालकांना सात दिवसांत संपर्क साधण्याचे आवाहन


या बैठकीत लोणावळा-खंडाळा शहराला स्वच्छ पर्यटन शहर बनविणे , बायो-CNG आधारित आधुनिक प्रक्रिया केंद्र उभारणे, जुन्या डंपिंग यार्डचे उच्चाटन करणे , १००% दैनंदिन कचऱ्याचे वैज्ञानिक व्यवस्थापन , महाराष्ट्रासाठी आदर्श हिल-टाउन मॉडेल विकसित करणे बाबत चर्चा झाली . या प्रकल्पासाठी राज्य शासन आणि जिल्हा नियोजन समितीमार्फत निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्र्यांनी दिले.बैठकीनंतर आमदार सुनील शेळके यांनी सांगितले की, “लोणावळा-खंडाळा हे पर्यटन केंद्र म्हणून देश-विदेशात प्रसिद्ध आहे. स्वच्छता आणि पर्यावरणपूरक उपाययोजनांद्वारे या शहराची प्रतिमा अधिक उंचावण्याचा संकल्प आज प्रत्यक्षात उतरणार आहे.”

Follow Us On