मावळ ऑनलाईन – लोणावळा शहर पोलिसांनी(Lonavala) सीसीटीव्ही फुटेज च्या आधारे एका चोरट्याला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून चोरी केलेल्या पाच टाक्या देखील हस्तगत करण्यात आल्या आहेत.
चिंतामणी अरुण पोळेकर (वय 25, गुरववस्ती, कुसगाव बुद्रुक, लोणावळा) असे या गॅस सिलेंडरच्या टाक्या सोडणाऱ्या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणावळा शहरात मागील काही दिवसांपासून घरगुती गॅस सिलेंडरच्या टाक्या चोरीला जात असल्याचा प्रकार घडत होता. याप्रकरणी लोणावळ्यातील आकांक्षा गॅस एजन्सी चे वितरक वीरेंद्र विठ्ठल पवार यांनी 9 ऑगस्ट रोजी लोणावळा शहर पोलीस स्टेशन मध्ये वितरणाच्या गाडीमधील गॅस टाकी चोरीला गेली असल्याची तक्रार दिली होती.
लोणावळा मधील भारत गॅस एजन्सी यांच्या आकांक्षा एजन्सी या वितरकाच्या गाडीमधून 8 ऑगस्ट रोजी एक गॅस ची टाकी चोरी झाली असल्याची तक्रार वाहन चालक आणि वितरक पवार यांच्याकडे केली होती. त्या तक्रारीच्या अनुषंगाने प्रियदर्शनी संकुल या परिसरामधील कॅमेरे चेक केले असता एक दुचाकी गाडी मागेपुढे नंबर प्लेट नसलेली त्यावरून एक युवक गॅस टाकी घेऊन जात असल्याचे निदर्शनास आले. मागील महिना दीड महिन्यामध्ये पाच टाक्या अशाच प्रकारे चोरीला गेल्या होते. याप्रकरणी वीरेंद्र पवार यांनी लोणावळा शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने लोणावळा शहर चे पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे व त्यांच्या स्थानिक गुन्हे पथकाने उपलब्ध सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय माहितीच्या आधारे चोरट्याचा मागोवा घेत त्याला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून चोरी केलेल्या टाक्या पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत.
Khed Accident: कुंडेश्वर येथे दर्शनासाठी जाणाऱ्या पिकअपचा अपघात;आठ महिलांचा मृत्यू, १७ जखमी
Kranti Din : क्रांतिकारक हुतात्मा विष्णू पिंगळे यांना अभिवादन!
आरोपीला न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी दिली असून तपासामध्ये अजून काही माहिती व मुद्देमाल मिळतोय का याचा तपास लोणावळा शहर पोलिस करत आहेत.