मावळ ऑनलाईन – लोणावळा शहर परिसरात हस्तांदोलनाचे बहाण्याने एका ( Lonavala Crime News) ज्येष्ठ नागरिकाची सोन्याची अंगठी लंपास करण्यात आली आहे. ही घटना लोणावळ्यातील बांगरवाडी रस्ता परिसरात बुधवारी (दि.16) भर दिवसा घडली.
Tanuj Veerwani : अभिनेता तनुज वीरवाणी याच्या लोणावळ्यातील बंगल्यातून पावणेदोन लाखांचा ऐवज लंपास
याप्रकरणी संबंधित जेष्ठ नागरिकाने लोणावळा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. यावरून पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज द्वारे संशयीतांचे फोटो हस्तगत केले आहेत.
PCU : औद्यागिक मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते जीईसीचे दुबईमध्ये होणार उद्घाटन
ज्येष्ठ नागरिकाने दिलेल्या तक्रारीनुसार, फिर्यादी हे चालत जात असताना, समोरून दुचाकीवरून दोघे त्यांच्याजवळ आले. त्यांनी फिर्यादी यांना पत्ता विचारण्याच्या पाहण्याने चर्चा केली. यावेळी त्यांनी प्रसाद आणला असून जवळपास आश्रम किंवा मंदिर आहे का जीथे आम्हाला प्रसाद वाटप करता येईल असे कारण सांगितले. यावेळी फिर्यादीने जवळच मारुती मंदिर असल्याचे त्यांना माहिती दिली.
यावेळी फिर्यादी यांना धन्यवाद करण्याच्या बहाण्याने आरोपीने त्यांना हस्तांदोलन केले, यावेळी फिर्यादी यांच्या हातातील आठ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी त्यांच्या नकळत काढून घेतली. तिथून ते पसार झाले तक्रारीवरून लोणावळा शहर पोलिसांनी त्वरित ॲक्शन घेत परिसरातील सीसीटीव्ही फुटेज हस्तगत केले यामध्ये दोन्ही संशयित दिसत आहेत त्यानुसार पोलीस पुढील तपास करत ( Lonavala Crime News) आहेत.