मावळ ऑनलाईन – लोणावळा शहरात एका अकरा वर्षीय अल्पवयीन ( Lonavala Crime News) मुलावर लैंगिक अत्याचार झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या प्रकरणी लोणावळा पोलिसांनी एका 18 वर्षीय तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करत अटक केली आहे.
Sahara Old Age Home : गणेशोत्सवानिमित्त सहारा वृध्दाश्रमात हभप मोरे महाराज यांची किर्तन सेवा
ही घटना सोमवारी (1 सप्टेंबर) रोजी सकाळी साडे दहाच्या सुमारास ( Lonavala Crime News)लोणावळ्यातील हनुमान टेकडी परिसरातील सार्वजनिक शौचालयात घडली. याप्रकरणी मुलाच्या आजीने पोलिसात फिर्याद दिली आहे. फिर्यादीच्या तक्रारीनुसार, आरोपीने अल्पवयीन मुलास सार्वजनिक शौचालयात जबरदस्तीने आत ओढून नेऊन त्याच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर संबंधित कुटुंबीयांनी तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेतली.
Devendra Fadnavis : मी प्रत्येक समाजासाठी काम करत राहील-देवेंद्र फडणवीस
या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायदा (POCSO Act) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव ( Lonavala Crime News) हे करत आहेत.