situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Lonavala Crime News : लोणावळ्यात सायबर फसवणुकीचा प्रकार; मोबाईलवर धमकी देत घेतले ८३ हजार रुपये

Published On:
Lonavala Crime News

मावळ ऑनलाईन – तुंगार्ली, लोणावळा येथे राहणाऱ्या एका सिव्हिल कॉन्ट्रॅक्टरच्या कुटुंबाला फसवणूक करणाऱ्या सायबर ठगांनी मोबाईलवरून खोट्या एफआयआरची भीती दाखवत तब्बल ८३ हजार रुपयांची आर्थिक लुबाडणूक केल्याचा धक्कादायक ( Lonavala Crime News) प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी लोणावळा शहर पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

Girish Prabhune : भटके-विमुक्तांकडे अनेक उपनिषदे होऊ शकतील एवढे ज्ञानभांडार – गिरीश प्रभुणे

फिर्यादी नारायणदास गोविंददास मजेठिया (वय ६४ वर्षे, व्यवसाय – सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर, रा. प्लॉट नं. ५०, बद्री विशाल सोसायटी, डीन व्हिला जवळ, तुंगार्ली, ता. मावळ, जि. पुणे) हे आपल्या पत्नी शोभना आणि मुलगी कृतीका यांच्यासह घरी असताना त्यांची पत्नी शोभना यांना ९७४९८९४१९६ या मोबाईल क्रमांकावरून एक फोन आला. “मी राहुल बोलतोय, टेलीकॉम डिपार्टमेंटच्या नोटिफिकेशन युनिटमधून,” असे सांगत बोलणाऱ्या व्यक्तीने, “तुमच्यावर एफआयआर दाखल झाला असून तुम्ही हॅरेसमेंट अ‍ॅम्बुश प्रकरणात आरोपी आहात,” असे सांगून भीती ( Lonavala Crime News) दाखवली.


Pimpri Chichwad 26 June 2025 : बेकायदेशीरपणे गॅस रिफील प्रकरणी एकास अटक

यानंतर ७३७७३७५५७२ या मोबाईल नंबरवरून व्हॉट्सअ‍ॅप कॉल करून संबंधित इसमाने त्यांच्या पत्नीला घराबाहेर न पडण्याचा आदेश देत, त्यांच्या नावे असलेल्या ओळखपत्रांसह विविध कागदपत्रांची मागणी केली. याच दरम्यान कायदेशीर कारवाईची धमकी देत त्यांच्या तीन वेगवेगळ्या बॅंक खात्यांवर एकूण ८३,००० रुपये पाठवण्यास भाग पाडले.

या संपूर्ण प्रकरणात फिर्यादींच्या कुटुंबाची आर्थिक फसवणूक झाल्याचे उघडकीस आले असून, फिर्यादीने लोणावळा शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनंतर अज्ञात मोबाईल नंबर वापरणाऱ्या व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात ( Lonavala Crime News) आला आहे. या आरोपींनी २१ जून ते २४ जून २०२५ दरम्यान ही फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले आहे.

फसवणुकीसाठी वापरलेले मोबाईल क्रमांक – ९७४९८९४१९६, ८९००१६०१६९, ७३७७३७५५७२, ८३३७९२६०८८ – हे सर्व अनोळखी असून पोलिसांकडून या क्रमांकांच्या आधारे तपास सुरू आहे.

या घटनेमुळे पुन्हा एकदा सायबर फसवणुकीच्या वाढत्या प्रकारांबाबत जनतेने सावध राहण्याची गरज अधोरेखित झाली आहे. कोणतीही शासकीय किंवा कायदेशीर नोटीस, धमकी किंवा गुन्हा दाखल झाल्याची माहिती मोबाईलवरून येत असल्यास त्याला बळी न पडता तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत ( Lonavala Crime News) आहे.

Follow Us On